विहिंप स्थापना दिवस संपन्न....

विहिंप स्थापना दिवस संपन्न.... 
आर्णी..... 
विश्व हिंदू परिषद चा स्थापना दिना निमित्त आर्णी येथील साई कॉम्प्लेक्स येथे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
  विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस एवम धर्म रक्षा निधी समर्पण  निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अनिल बेलगमवार तर प्रमुख उपस्थितीत 
मंचावर विराजमान असलेले   विभागाचे संघचालक विजयजी कोषटवार
कार्यक्रमचे प्रमुख वक्ते आणि विहिंप चे प्रांत अध्यक्ष तसेच आमचे मार्गदर्शक राजेश्वर निवल, प्रमुख अतिथी जिल्हा संयोजक बजरंग दल भुपेंद्र सिंग परिहार, आर्णी विहिंप चे प्रखंड अध्यक्ष राजेश माहेश्वरी,  चेंबर आफ कॉमर्स चे कार्याध्यक्ष भिकुभाई पटेल हे उपस्थीत होते.
      कार्यक्रमा ची सुरवात रामदरबार व भारतमातेच्या प्रतीमा  पूजन आणि माल्यार्पण करून कार्यक्रम ची सुरवात केली. 
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि विहिंप चे विदर्भ प्रांत अध्यक्ष राजेश्वर निवल यांनी सर्वांना मार्गदर्शन करीत म्हणाले की वर्तमान काळात चालू असलेल्या अफगाणिस्तान आणि नागपूर मधील इस्लामिक जिहादी परिस्थिती बद्दल सर्वांना  जागरूक राहावे "धर्म रक्षितो रक्षीत:" या विहिंप च्या ब्रिदवाक्य म्हणजे जर आपण धर्माची रक्षा केली तर धर्म आपली रक्षा करेल तसेच या साठी आपण तत्पर राहून याच्यासाठी आपण स्वताहून या कार्या साठी धर्म रक्षा निधी जमा करण्याचे आवाहन विहिंप विदर्भ प्रांत राजेश निवल यांनी आवाहन केले.  बजरंग दल जिल्हा संयोजक भुपेंद्र सिंह परिहार यांनी स्थापना दिवसाचे महत्व आणि आपले कार्य तसेच आगामी काळातील जबाबदारी याबद्दल सर्वांना माहिती दिली.
 यावेळी विहिप प्रखंड मंत्री पुनीत मजेठिया , प्रखंड  संयोजक सचिन  मेसरे, सह संयोजक अमोल  इंगोले, नगर संयोजक अक्षय  माहुरे , प्रकाश  सरोदे, प्रवीण अण्णा मुनगीनवार, सुनील जोशी, प्रखर बजरंगी गोपाल शर्मा , नगर कार्यकरणी , प्रखंड कार्यकरिणी   तसेच विविध शाखेतील बजरंगी दल चे पदाधिकारी आणि धर्मप्रेमी हिंदू नागरिकांकडून भगवान प्रभू श्री राम एवम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून निधी समर्पण करण्यात आले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत शुक्ला  यांनी केले .