साक्षरता सामाजिक व आर्थिक विषमता दूर करते : उपप्राचार्य अशोक ताकसांडे
नेर- समाजात जगताना फक्त पैसा असून उपयोग नाही तर साक्षर असणेही गरजेचे आहे. साक्षरता सामाजिक व आर्थिक विषमता दूर करते. असे मत दि. इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक ताकसांडे यांनी व्यक्त केले.
येथील दि. इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन एम एम एस) शिष्यवृत्ती परीक्षा प्रबोधन व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी उपप्राचार्य अशोक ताकसांडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि. इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन उईके होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद मराठी शाळा क्रमांक २ चे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित मुख्याध्यापक रमेश राठोड, शिष्यवृत्ती परीक्षा शिक्षक तज्ञ राकेश मडावी, पर्यवेक्षक श्याम देशमुख, कमवि प्रमुख प्रा. किशोर राठोड, मनोज दुधे, रश्मी बोभाटे उपस्थित होते.
यावेळी राज्यस्तरीय गुरु गौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ हा बहुमान मिळालेल्या शिक्षिका रश्मी बोभाटे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित इतर मान्यवरांनीही आपले समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शकुंतला कोकाटे, रेखा धांदे, कल्पना खोडवे, माधुरी पांडे, प्रज्ञा आवारे, सोनाली देशमुख, कीरण राय, प्रा. डॉ. उज्वला राऊळकर, प्रा. अरुण नरवडे, किशोर सोसे, अनिल पठाडे, नीरज भगत, अजय मोरे, यांनी पुढाकार घेतला.
या कार्यक्रमाला प्रा. निरज चिंचोळकर, प्रा. सुनिल गावंडे, प्रा. प्रवीण मिसाळ, प्रा. अनंत हिरुळकर, प्रा. सुचित अक्कलवार, प्रा. मोहन भलावी, प्रा. पद्माकर कायपेल्लीवार, प्रशांत पेठकर, सुनिल ताजणे, गोपाल राठोड उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य अशोक ताकसांडे यांनी केले. पाहुण्यांच्या परिचय प्रा. प्रशांत बुंदे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन श्याम गुल्हाने यांनी तर आभारप्रदर्शन सुरेश कनाके यांनी केले.