महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रवेश सोहळा संपन्न
उमरखेड{प्रतिनिधी}
दिनांक.७.९.२०२१.रोजी उमरखेड शहर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जवळपास २०० ते २५० तरुणांचा पक्ष प्रवेश करून मनसेची *हिंदुजनायक मा. राजसाहेब ठाकरे* यांचा विचार घराघरात पोहचण्याच्या हेतूने मनसेची बांधणी करण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून. मनसेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार व मनविसे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ हमदापुरे,जिल्हा उपाध्यक्ष डेव्हिडभाऊ शहाणे,ता.अध्यक्ष शेख सादिक,आर्णी ता.अध्यक्ष सचिन एलगंधेवार,कपिल ठाकरे,दत्ता पिलवंड माजी पं स सदस्य.आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पूजा करण्यात अली.त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी देवाभाऊ शिवरामवार व अनिलभाऊ हमदापुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व मार्गदर्शनात अनिलभाऊ हमदापुरे यांनी तरुणांना पक्ष्यांची ध्येय धोरणे समजून सांगितले.
तसेच उमरखेड शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची पद नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीमुळे व पक्ष प्रवेश्याने शहरात व तालुक्यातील तरुणांत नवचैतन्य निर्माण झाले..सदर कार्यक्रमात प्रस्ताविक संजय बिजोरे पाटील तसेच सूत्रसंचालन माधव नरवाडे व आभार विक्की पडघने यांनी केले हे पक्ष प्रवेश यशस्वी करण्यासाठी संजय बिजोरे पाटील शहर अध्यक्ष.प्रविण भिमटे मनविसे, जिल्हा उपाध्यक्ष.विक्की पडघने, मनविसे श.अधिक संदीप कोकाटे, मनसे श.उपाध्यक्ष अमोल लांबटीळे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
*फोटो*