उमरी येथील पावसामुळे घरांची भिंत कोसळली
जिवितहानी टळली,घरांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान
कळंब : तालुक्यात काही दिवसापासून पावसाने हजेरी लावली असता दि.६सप्टेंबर ऐन पोळ्याच्या दिवशी, मुसळधार पावसाने विजेच्या गड गडात सहित जोरदार हजेरी लावली.
या दरम्यान तालुक्यातील उमरी या गावी इंदिरा चौक वॉर्ड क्र.१मध्ये वास्तव्यास असलेले श्री.गजानन गवारकर यांच्या घराच्या भिंतीला पाणी मुरल्यामुळे भिंत कोसळली त्यामुळे जीवितहानी टळली पण घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ही घटना तलाठी यांना कळवताच त्यांनी पाहणी केली असुन.
ज्यांच्या घरावर छत राहिले नाही अशांना पंचनामा करून प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी उमरी येथील नुकसानग्रस्त श्री गजानन गवारकर यांनी केली आहे.