काँग्रेस प्रदेश सचिव जावेद अंसारी यांनी बुडून मृत्यु झालेल्या तरुणांच्या कुटुंबाला दिला मदतीचा हातप्रत्येकी 25 हजाराची आर्थिक मदत दिली जाणार

काँग्रेस प्रदेश सचिव जावेद अंसारी यांनी बुडून मृत्यु झालेल्या तरुणांच्या कुटुंबाला दिला मदतीचा हात

प्रत्येकी 25 हजाराची आर्थिक मदत दिली जाणार

दिग्रस :
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस  येथील राहणारे तरुण कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरू असलेल्या 'उर्स' मध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते त्यावेळी ते दर्ग्याला जायच्या आधी पोहायला गेले असता त्यांच्यावरती हा काळाने घाला घातला आहे.
                कन्हान नदीमध्ये बुडून 
सय्यद अरबाज उर्फ लकी वय 21 वर्ष, ख्वाजा बेग वय 19 वर्ष, सिबतैन शेख 20 वर्ष, अय्याज बेग 22 वर्ष, मो अबुजर 21 वर्ष या पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे, 
          या पाच पैकी चार तरुणांचे मृतदेह मिळाले असून अय्याज बेग या तरुणाचा शोधकार्य एसडीआरफ चे पथक करतच आहे.
अश्यातच काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सौ.संध्याताई सव्वालाखे व जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्जा
यांच्या सूचनेनुसार नवनियुक्त महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव जावेद अंसारी हे काल रात्री दिनांक 7 सप्टेंबर रोजी बुडून दुर्दैवी मृत्यु झालेल्या या तरुणांच्या कुटुंबाला सांत्वन पर भेट देण्याकरिता यवतमाळ वरून दिग्रसला आले असता त्यांच्या असे निदर्शनास आले या तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर आले असुन यातील तीन कुटुंबाची आर्थिक स्थिती खूप दयनीय असून मो. सिबतैन हा फरशा बसविण्याचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरिर्वाह करत होता कारण त्याचे वडील आंधळे असल्यामुळे काम करू शकत नाही तसेच ख्वाजा बेग हा तरुण टाइल मजूर होता व त्याचे वडील गाड्यावर फळ विकून कुटुंबाचा गाडा चालवत आहे व अय्याज  बेग याचे वडील हाफिज बेग यांचे सायकल स्टोअर आहेत.
या कुटुंबाची हलाखीची परिस्तिथी पाहता या कुटुंबाच्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मदतीचा हात पुढे करत जावेद अंसारी यांनी त्यांच्याकडून यातील तीन कुटुंबांना प्रत्येकी पंचवीस- पंचवीस हजाराची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली व शासनाकडून देखील काही मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या पूर्वी देखील दिग्रस येथील पुरग्रस्तांना धान्य किट चे वाटप करून जावेद अंसारी यांनी माणुसकीचा परिचय दिल्याने या भागातील नागरिकांसाठी ते नवीन नसल्याची भावना दिग्रसकरांनी त्यांच्या या भेटीच्या निमित्ताने  व्यक्त केली आहे. कोरोना काळात देखील अंसारी हे सातत्याने गरीब व गरजवंतांना मदत करत आलेले आहे त्यांच्या या वृत्तीमुळेच यवतमाळ जिल्ह्यात सढळ हाताने मदत करणारा नेता म्हणून त्यांचे नांव लौकिक आहे.