कर्करोगग्रस्त इसमाची गळफास लावून आत्महत्या

कर्करोगग्रस्त इसमाची गळफास लावून आत्महत्या

     घुग्घुस प्रतिनिधी


     मंगळवार 21 सप्टेंबर रोजी सकाळी दरम्यान घुग्घुस येथील शालिकराम नगर येथे राहणाऱ्या आनंद रतन कोम्मु (38) याने घरा समोरील निंबाच्या झाडाच्या फांदीला दुपट्याने गळफास लावून आत्महत्या केली ही घटना सकाळी दरम्यान उघडकीस आली.
   घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूर येथे पाठवला. घुग्घुस पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास करीत आहे. मृतक आनंद कोम्मु हा मागील काही वर्षांपासून कर्करोगग्रस्त होता आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.