उमरखेड तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांचेकडून सरकारने दिलेले निष्कृष्ठ दर्जाचे मोबाईल परत
{एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी याना निवेदन}
उमरखेड{प्रतिनिधी}
राज्यातील सव्वा लाख अंगणवाडी सेविकांच्या वाढीव मानधनाच्या प्रलंबित प्रश्नाकडे कानाडोळा करून राज्य सरकारने त्यांना त्यांच्या कामाची नोंद करण्यासाठी मोबाइल दिले.पण अनेक सेविकांचे फोन आता बंद पडले आहेत.जे सुरू आहेत त्यांना रेंज नसते.
त्यातच हे 'स्मार्टफोन' वापरायचे कसे,हेच माहिती नसल्याने त्यांच्यासमोर 'मोबाईलचा पेच' निर्माण झाला आहे.
शासनाने राज्यातील १ लाख ५ हजार ५९२ अंगणवाडी सेविकांना २०१९ मध्ये मोबाइल दिले होते.
या मोबाईलवरून सेविका शासनाला लाभार्थीची वजन, उंची, हजेरी, स्तनदा मातांचा आहार इत्यादी माहिती पाठवत असतात. हे मोबाइल दोन जीबी रॅमचे आहेत,
त्यांची क्षमता कमी आहे. त्यामुळे ते व्यवस्थित चालत नाहीत.
मे २०२१ मध्ये त्यांची वॉरंटी संपली आहे.मोबाइल नादुरुस्त झाल्यानंतर दुरुस्तीसाठी खर्च येतो.हा खर्च सेविकांकडून वसूल केला जातो.अंगणवाडी कर्मचारी संघाने वारंवार महाराष्ट्र शासनाकडे मोबाइल बदलून देण्याची मागणी केली.
परंतु निधीचे कारण देत सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.त्यामुळे सेविकांना मोबाईलवरून काम करणे मुश्किल झाले आहे.त्यामुळे अखेर 17 ऑगस्टपासून मोबाईलच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी संघाने घेतला आहे.
व राज्यभर अंगणवाडी सेविकांनी निकृष्ट मोबाइल शासनाला परत देण्याचे आंदोलन सुरू केले आहे.
उमरखेड तालुक्यात २१७ अंगणवाडी आहेत .त्या प्रत्येक अंगणवाडी सेविका भडकल्या,
आज उमरखेड येथील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारा यांच्या हवाली निवेदन देऊन केली आहे .
यावेळी अरुणा अलोने, कविता कदम, अलका भागवत, छाया पांढरे,सुमन भगत, सुरेख देशमुख,रेखा पाईकराव, माला चव्हाण, सीमा खोपे,माला नांदूरकर व अनेक महिला उपस्थित हित्य .
*फोटो*