आदिवासींना खावटीच्या नावाने बोगस धान्य व किराना किटचे वाटप वंचित बहुजन आघाडी घाटंजी

आदिवासींना खावटीच्या नावाने बोगस धान्य व किराना किटचे  वाटप* वंचित बहुजन आघाडी घाटंजी

  प्रतिनिधी :-घाटजी

आदिवासींना पावसाळ्यात माहे जुन ते सप्टेंबर या कालावधीत रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून त्यांना आर्थिक अडचण निर्माण होऊ नये तसेच या कालावधीत त्यांची उपासमार होऊ नये म्हणून सन १९७८ पासून खावटी कर्ज योजना सुरु करण्यात आली होती त्याच धर्तीवर . 
                             शासन निर्णय दिनांक ०९/०९/२०२० नुसार आदिवासींना खावटी अनुदान योजना जाहीर करण्यात आली परंतु या निर्णयानुसार प्रमुखतःआदिवासींना खावटी अनुदान योजनेपासून वंचित ठेवण्यासाठी जाचक अटी लादण्यात आलेल्या आहेत.त्यापैकी मनरेगावर एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर ( दिनांक १ एप्रिल,२०१९ ते ३१ मार्च,२०२० या कालावधीत ) ही मुख्य जाचक अट रद्द करण्यात यावी या अटीने महाराष्ट्रातील बहुसंख्य आदिवासी जमात खावटी अनुदानापासून वंचित राहणार आहे.शासन निर्णय होऊन वर्ष होत आले परंतु अजून खावटी मिळाली नाही,अर्ज भरून नेली परंतु यादीत नाव आले नाही,यादीत नाव आले परंतु पैसे मिळाले नही,यादीत नाव आले मोबाईलवर एस.म.एस. आला पैसे जमाच झाले नाही अश्या असंख्य अडचतणी खावटी अनुदान (२०२०-२१) योजने रखडलेली आहे.
                              शासन निर्णयानुसार प्रति कुटुंब ४००० रुपये एवढी खावटी देण्यात येते. पहिला टप्पा २००० रुय्ये लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करून दुसर टप्पा रुयये २००० चे धान्य व किराणा वाटप करण्यात येते .गेल्या काही दिवसापासून खावटीच्या स्वरूपात जे धान्य व किराणा वाटप चालू असून त्या मध्ये मिळणारे धान्य व किराणा अतिशय कमी दर्जाचे आणि ठरलेल्या किमती पेक्षा कमी किमतीचे धान्य व किराणा किट वाटप करण्यात येत आहे अशी संपूर्ण आदिवासी समाजाचे मत आहे . 
                                 सदर खावटी अंतर्गत मिळालेल्या धान्य व किराणा किट ची खाद्य  विभागामार्फत योग्य ती चौकशी करून रुपये २००० किमतीचेच दर्जेदार धान्य व किराणा किट वाटप करण्यात यावे व यासंबधी योग्य ती चौकशी करून आठ दिवसच्या आत निर्णय घ्यावा अन्यता तमाम आदिवासी बांधवाच्या व वंचित बहुजन आघाडी च्या वतीने रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे यांनी दिला वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात आदिवासी बांधव धडकले तहसीलदारामार्फात मुख्यमंत्री याना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष उमेश कुडमते,राजू सोयाम,देवानंद गेडाम,नरेश पेंदोर ,महेंद्र गेडाम,तुकराम कोरवतेमधुकर सीडाम, सुभाष गेडाम ,यादव मेश्राम , वसंता तोडसाम ,अनिल तोडसाम , राजू मरस्कोल्हे , लक्ष्मी सोयम , तुळसाबई मेश्राम , संदीप कोवे, नरेश पेंदोर , बळीराम सीडाम,  लक्ष्मण कोहचडे, अंकुश जुमनाके, मंदा सोयम, उज्वला पेंदोर , माणिक सोयम, मोहन मेश्राम , सुहास सिडाम, दीपक तोडसाम असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.