भाजपा च्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार
- मुंबई येथे संपन्न झालेल्या दसरा मेळाव्यात समाजामध्ये तेढ असंतोष निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात दगली व्हाव्यात या उद्देशाने उत्तर प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात भडककाऊ भाषण देऊन त्यांना समाजातील जमावाने मारहाण करून त्यांची बेइज्जती करावी व समाजामध्ये कायम तेढ निर्माण होऊन दंगा निर्माण करून समाजाचे नुकसान व्हावे म्हणून चिथावणीखोर भाषण करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी गुन्हा केलेला आहे.
अशा आशयाची तक्रार जिल्हा भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस राजू पडगिलवार यांनी यवतमाळ शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.
उत्तर प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी हे हिंदू धर्माचे प्रखर समर्थक आणि संपूर्ण जीवन समाजाप्रती व धर्माप्रती समर्पित केलेले महान नेते आहेच .त्यांच्याप्रती आम्हा सर्वांना विश्वास श्रद्धा असून त्यांच्याविरुद्ध अशा प्रकारचे चे वक्तव्य केल्यामुळे भारतीय जनता पार्टीने आक्रमक पवित्रा उचलला आहे. आहे. ही तक्रार देते वेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, जयदीप सानप, विजय खडसे गटनेते, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश धूरट, शंतनु शेटे, सुनील बावनकुळे, सुरज विश्वकर्मा ,अश्विन तिवारी ,योगेश पाटील आदी उपस्थित होते.