विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन पार पडले
९२ विदर्भवाद्यांना अटक व सुटका*
यवतमाळ
जिल्हा प्रतिनिधी/रोहन आदेवार
आज दि.२६ ऑगस्ट रोज गुरुवार ला विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वणीत रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकार स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय घेत नसल्यामुळे विदर्भातील जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. सरकार कडून गेली ६० वर्षांपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे.शेतकरी आत्महत्या,कुपोषण,नक्षलवाद, वीज महाग,विदर्भातील युवकांच्या नौकऱ्या पळवणे असा अन्याय होत आहे त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समिती कडून सन २०२३ साठी विदर्भ मिशन अंतर्गत ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली आहे.त्याचाच एक भाग म्हणुन आज संपूर्ण विदर्भात विदर्भातील ११ ही जिल्यात आणि १२० तालुक्यात रास्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.त्याचंच एक भाग म्हणून वणी शहरातील साई मंदिर समोर यवतमाळ रोड येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
त्याचसोबत स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती करा व विदर्भातील जनतेसाठी विजेचे दर निम्मे करा,वेगळा विदर्भ झालाच पाहिजे,लेके रहेंगे लेके रहेंगे विदर्भ राज्य लेके रहेंगे,विदर्भ के गद्दारो को जुते मारो सालो को अशा घोषना देत आज दि.२६ ऑगस्ट रोज गुरुवार ला वणी येथिल साई मंदिर समोर रोड यवतमाळ येथील चौकामध्ये चक्का जांम आंदोलनात करण्यात आले. यावेळी यवतमाळ मार्गावर काही वेळापुरता चक्काजाम झाला होता.परंतु पोलीसांचा चोक बंदोबस्त ठेवल्यामुळे हा रास्ता रोको फार काळ ठेवता आला नाही त्यामुळे हा रास्ता रोको शांततेत पार पडला. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पुरुषोत्तम पाटील,रफिक रंगरेज, देवराव धांडे,राहुल खारकर,राजू पिंपळकर,अमित उपाध्ये,संजय चिंचोळकर,प्रमोद खुरसाने,राजकीरण कहाते,अजय पोहणे,दशरथ पाटील,बालाजी काकडे,बाळकृष्ण राजूरकर,विनोद मुसळे,अलका मोहाडे, शालिनी रासेकर,राहुल झट्टे,कमलेश भगत,सुरेखा वडीचार, नीलिमा काळे, मंदा तांमगडगे,गीता दोरखंडे, चंद्रकला धूमने, मंजू मंदळे,कलावती क्षीरसागर यांचेसस महिला,पुरुष,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.