एकाच दिवशी जावई सासऱ्याचा मृत्यू
चंद्रपूर जिल्हातील हिरापुर येथील हृदय हेलावणारी घटना घडली असुन यामध्ये सासऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात घेवुन जात असताना अज्ञात वाहन चालकांने शवविच्छेदनदानासाठी घेवून जाणाऱ्या वाहनाला धडक दिल्याने जावयाचा जागी मुत्यु झाल्याने मायलेकी विधवा झाल्याने या घटनेने हिरापुर परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा
हिरापुर येथील रहिवासी किसन चिडांम यांचा सायंकाळी शेतात काम करत असताना अचानक मुत्यु झाला या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल किसन चिडांम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुटुंबांना ताब्यात देण्यात आला कुटुंबातील सदस्यांनी गावातील लोक पिक-अप भाड्याने करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेत असताना यादरम्यान चिमूर कानपा मार्गावरून जात असताना शंकरपुर याठिकाणी पिक-अप ला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात चालकासह सहा जखमी झाले असुन त्यांना चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. जावई शंकर गोमा खडाते यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला एकाच दिवशी सासरा जावयाचा मृत्यू झाल्याने हिरापुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.