२लाख दंड व २ मूळ कागदपत्रे कधी देणार?बोगस अधिकारी हटाव

२लाख दंड व २ मूळ कागदपत्रे कधी देणार?

बोगस अधिकारी हटाव नारा

शिक्षक सुशिलकुमार पावरा यांचे पावसातही उपोषण सुरूच  

रत्नागिरी:आपल्या न्याय मागण्यांसाठी शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी आज ०८ जुलै २०२१ रोजी दापोली जिल्हा  रत्नागिरी येथे आपले  उपोषण पाऊस पडत असतानाही  सुरूच ठेवले आहे. आज दापोलीत जोरदार व मध्यम पाऊस पडत असतानाही सुशीलकुमार पावरा यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले. बोगस अधिकारी हटाव, २ कागदपत्रे २लाख दंड असे नारे हातात घेऊन उपोषण करत आहेत.   उपोषणाचे निवेदन  गटविकास अधिकारी  पंचायत समिती दापोली जिल्हा  रत्नागिरी यांना दिले आहे.
निवेदनाची पोहच घेतली आहे.  दोषी, भ्रष्टाचारी, षडयंत्रकारी व बोगस अपंग प्रमाणपत्र धारी श्री. विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली व बोगस डिग्रीधारक,दोषी नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली या दोन्ही बोगस शिक्षण विस्तार अधिकारी यांना सेवेतून बडतर्फ करा व माझी मुळ कागदपञे 2 लाख दंडाच्या रक्कम सह परत करा तसेच माझ्या २५ मागण्यांची तात्काळ पूर्तता  करा.या मागणीसाठी ०८ जुलै   २०२१ रोजी सुशिलकुमार  पावरा, उपशिक्षक, जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकदर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांचे  हे १३७ वे उपोषण सुरू  आहे.
          निवेदनात म्हटले आहे की,विजय दाजी बाईत ,शिक्षण विस्तार अधिकारी  दापोली हे जिल्हा बदली शिक्षकांकडून प्रत्येकी रूपये २२,०००/ घेणे, अनेक कामांसाठी शिक्षकांकडून आर्थिक  मागणी करणे ,माझ्या विरोधात रचलेल्या षडयंत्र प्रकरणात स्वतः ला वाचविण्यासाठी आदिवासी शिक्षकांकडून जबरदस्तीने  दमदाटी धमकी देऊन स्वतः लिहून ठेवलेल्या पञावर व बान्डपेपरवर सह्या करून घेणे,महिला कर्मचारी यांचा छळ करणे,शिक्षकांचे पगार जाणीवपूर्वक न काढणे इत्यादी गंभीर प्रकरणात दोषी ठरले आहेत. श्री. विजय बाईत दोषी ठरल्याचा चौकशी अहवाल मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली, मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती गुहागर, मा.शिक्षण विस्तार अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक  जिल्हा परिषद रत्नागिरी या ञिसदस्य चौकशी समितीने दिनांक ०४/१०/२०१८रोजी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केला आहे. विजय बाईत यांच्या विरोधातल्या दिनांक २९/१०/२०१८ व दिनांक ०४/०७/२०१८ रोजीच्या दोन्ही चौकशी अहवालात विजय बाईत हे दोषी ठरलेले आहेत. दिनांक ०४/०७/२०१८ रोजीच्या विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या चौकशीच्या अनुषंगाने श्री. महेश जोशी तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सह काही मंञी,राजकीय पदाधिकारी, समाजकंटक व पालकामार्फत  विजय दाजी बाईत यांनी माझे विरोधात षडयंत्र रचून मला खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवले.सदर षडयंञात श्री. विजय दाजी बाईत तत्कालीन  प्रभारी गटशिक्षणाधिकारी खेड,  महेश जोशी तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, नंदलाल कचरू शिंदे तत्कालीन शिक्षण विस्तार अधिकारी दापोली,  एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सह राजकीय पदाधिकारी समाजकंटकांचा हात असून दोषी बोगस अधिकारी यांना राजकीय मंञी व पदाधिकारी यांच्या दबावापोटी तत्कालीन व सध्याचे मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी हे कारवाई करत नाहीत. 
माहिती अधिकार अर्ज कोर्टटिकीटसह फाडून फेकणे,अनेक ओरिजनल कागदपञे कार्यालयातून गायब करणे इत्यादी अनेक गंभीर प्रकरणात शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरीतील दोषी अधिकारी गुतलेले आहेत.हे दोषी अधिकारी एकामेकाला वाचविण्यासाठी माझ्यावरच उपोषणाचे क्षुल्लक कारण दाखवत कारवाई करून माझी कोंडी करतात,माझा अन्यायाविरोधातला आवाज जबरदस्तीने दाबतात. माझ्या विरोधात रचलेल्या षडयंत्र बनावट प्रकार पोलीस चौकशीत उघड झाला आहे. बनावट घटना प्रकारासंबंधीत अनेक तारखा खाडाखोड करून बदललेल्या सापडल्या. केन्द्प्रमुख फुरूस ता.खेड यांच्या अहवालानुसार घटना घडलीच नाही हे बनावटपणा दिसून आला आहे. बनावट अहवालात घटनेच्या तारखा बदल असलेला धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे दोषींना वाचविण्यासाठी काही गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यास जिल्हा परिषद रत्नागिरी  प्रशासन टाळाटाळ करत आहे.तसेच श्री. नंदलाल कचरू शिंदे  शिक्षण विस्तार अधिकारी खेड यांची  पदवी शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी अवैद्य बोगस आहे.असा अहवाल श्री. किरण लोहार तत्कालीन शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना सादर केला आहे व  नंदलाल कचरू शिंदे  शिक्षण विस्तार अधिकारी खेड यांच्या विरोधातल्या महिला अधिकारी व कर्मचारी यांचा छळ करणे इत्यादी  अनेक गंभीर प्रकरणात  दोषी ठरले असून अनेक महिला कर्मचारी अधिकारी, शिक्षक,संघटना यांच्या तक्रारी होत्या व आहेत.अशा दोषी,भ्रष्टाचारी, बोगस पदवीधारक, बोगस अपंग प्रमाणपत्र धारक, षडयंत्रकारी दोन्ही लायक नसलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी सह इतर दोषींवर अद्याप जिल्हा परिषद रत्नागिरीने कारवाई केली नाही. माझ्या मागण्यांसाठी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना १००००/ दहा हजार पेक्षा अधिक निवेदन/ स्मरणपञे मी दिलेली आहेत. तसेच १३५ वेळा उपोषणे झाली आहेत. तरी माझ्या मागण्यांचा  जाणीवपूर्वक दोषींना वाचविण्यासाठी  विचार केला जात नाही .म्हणून मी 08 जुलै     २०२१ रोजी  सकाळी११.०० वाजता पांगारवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे  माझे १३७वे उपोषण  करणार आहे. तरी मला परवानगी मिळावी.हीच नम्र विनंती.
             अजूनही न्याय मिळत नसल्यामुळे शिक्षक सुशिलकुमार पावरा पावरा यांचा सतत संघर्ष सुरू आहे. जिल्हा परिषद रत्नागिरी प्रशासन आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आपण नाईलाजाने ही उपोषण करत आहेत.  जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण करतच राहणार असल्याचे शिक्षक सुशिलकुमार पावरा यांनी उपोषणाच्या वेळी सांगितले आहे.