दोन दुचाकी व बसच्या अपघातात दोन युवक ठार , तर दोन जख्मी

दोन दुचाकी व बसच्या अपघातात दोन युवक ठार , तर दोन जख्मी


   तालुक्यातील दिग्रस-पुसद बायपासवर आज दि.१७ जुलै रोजी  १२ वाजताच्या सुमारास  दोन दुचाकी व एसटी बसच्या  विचित्र अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली , तर दोन जण आश्चर्यकारकरित्या बचावले .
           याबाबत सविस्तर असे की स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेऊन पवन मुन्शीराम गावंडे वय वर्ष २० व रवी रमेश पुंडे वय वर्षे २१ हे युवक आपल्या MH 29 BM 4234  दुचाकीने घरी परत जात होते . दिग्रस्- पुसद बायपासवरून परभणी आगराची बस क्रमांक MH 20 BL 2527 परभणी- चंद्रपूर  वाहनाला त्यांची जबरदस्त समोरासमोर धडक झाली . यात दोन्ही युवक गंभीर जखमी होवून एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याने वाटेत शेवटचा श्वास घेतला . 
          या अपघातामुळे घाबरून संतुलन बिघडल्याने MH 38 Y6439 ही दुचाकी देखील मागून बसवर आदळली . यात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे . खाजगी दवाखान्यात उपचार केल्याने त्या दोन्ही जखमींची नावे माहीत होऊ शकली नाही .
          दोन्ही मृतक-युवक स्थानिक देवनगर येथील रहिवासी असल्यामुळे अपघातस्थळी व ग्रामीण रुग्णालयात प्रचंड गर्दी उसळली होती . शवविच्छेदनानंतर दुपारी दोघांचे पार्थिव नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले . पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे .