जन्म दाता ठरला जिवन दाता वडिलांनी दिली मुलीला किडनी .
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील गंगाधर शिंदे यांनी आपल्या मुलीला किडनी देऊन एक वेगळाच आदर्श निर्माण केला . या मुळे मुलापेक्षा मुलीवर हि प्रेम करणारे बाप या धरतीवर असल्याचे आज तरी सिद्ध होते गंगाधर शिंदे यांना दोन मुले दोन मुली असा छोटासा परिवार हा जवळा बाजार येथे राहतो त्यांच्या दोन्ही मुली लग्न करुन हया बुलढाणा जिल्ह्यात मापारी परिवार मध्ये दिलेल्या आहेत परंतु मोठी मुलगी व जावाई हे प्राचार्य व मुलगी शिक्षक आसल्याने नौकरी निमित्त जवळा बाजार येथे राहतात संगीता सतीश मापारी असे त्यांचे संपूर्ण नाव आहे पंरतु या धावपळीच्या जिवनात कधी काय होईल सांगतायेत नाही असीच घटना संगीता यांच्या सोबत झाली त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या मुंबई .पुणे . हैदराबाद .औरंगाबाद. नगर व महाराष्ट्रातील जवळपास सर्व ठिकाणी तपासणी केली उत्तर एकच दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे दोन्ही परिवार हादरून गेले पंरतु वडील गंगाधर शिंदे यांनी हार न मानता मी मुलीला मरुच देणार नाही हा नीचय च केला माझ्या किडन्या माझ्या मुलीला देणार असे परिवारातील सर्व सदस्य ना ठणकावून सांगितले व सर्व वैद्यकीय तपासणी करून व शासकीय परवानगी घेऊन आज नांदेड येथील ग्लोबल या दवाखान्यात डॉक्टर राजीव राठोड. विजय मैदपवाड या डॉक्टर च्या टिमने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली अपली किडनी आपल्या मुलीला देऊन एक आदर्श बाप असल्याचे सिद्ध केले .