मतीमंद तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
दिग्रस तालुक्यातील घटना
तालुक्यातील सावंगा बु. येथील शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन एका मतीमंद तरुणीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.६ जून) सकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
रुपाली भगवान कांबळे (वय -१५) रा.सावंगा बु., ता.दिग्रस असे आत्महत्या केलेल्या मतीमंद तरूणीचे नाव आहे. दिग्रस तालुक्यातील सावंगा बु. येथील रुपाली कांबळे ही तरुणी आपल्या कुटुंबियांसमवेत शनिवारी दि.५जून रात्री घरीच झोपली होती. सकाळी जेव्हा कुटुंबियांना जाग आली. तेव्हा रुपाली ती झोपलेल्या जागेवर न दिसल्याने तिची शोधाशोध सुरू केली. शोध घेत असतांना जवळच असलेल्या शेतशिवारातील एका विहिरी जवळ दोन चपला आढळून आल्या. चपला दिसल्याने त्यांनी विहिरीत शोध घेतला असता. तिचा मृतदेह हाती लागला. तिचा मृतदेह दोराच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
सदर घटनेची माहिती दिग्रस पोलिस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर दिग्रस ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला. तिचे पश्चात आई, वडील, दोन बहिणी व भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात प्रभाकर जाधव, अविनाश राठोड व पोलीस कर्मचारी करत आहेत.