३०वर्षीय युवकाचा खुन



  ३०वर्षीय युवकाचा खुन

    बाबुळगाव येथील घटना

         मारेगाव वार्ता /प्रतिनिधी
              मुस्तफा खान 
       
बाभुळगाव  शहरातील नेहरू नगर येथे वास्तव्यात असलेल्या ३० वर्षीय युवकाचा घरा शेजारी झोपून असलेल्याचा फायदा घेत आरोपी यांनी  खून करून घटनास्थळावरुन पसार होण्याच्या बेतात असताना नागरिकांनी आरोपीला  पकडून ठेवले. ही घटना सोमवार दि.१७मे रोजी सांयकाळी ९ .३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले.
मृतक प्रविण गायकवाड  (वय ३०  रा. नेहरू नगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव असुन पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांना  घटनेची माहिती मिळताच 
तत्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनास्थळावरुन  लोखंडी राँड जप्त करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात येथे पाठविण्यात आला.  आरोपी अक्षय गोटफोडे यांना अटक करण्यात आली असुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होते वादाचे रूपांतर खुनामध्ये झाले  पुढील तपास बाबुळगाव पोलीस करत आहे.