मामासह दोन जणांचा धरणात बुडून मुत्यु

मामासह दोन जणांचा धरणात बुडून मुत्यु

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील घटना
              
    धानोरा गावात शोककळा
     
         मारेगाव वार्ता/प्रतिनिधी
                निलेश वजारी

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा गावातील मामा दोन भाच्यासह धानोरा येथील महासिध्द  लघु प्रकल्पा कडे फिरायला गेले होते. विनायक गाडगे तेजस गाडगे नामदेव  वानखडे हे पोहण्यासाठी धरणात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज लागला  नसल्याने १७मे रो दुपारी ३वाजताच्या सुमारास पुणे येथे एका प्रायव्हेट कंपनी मध्ये काम  
करणारा विनायक गाडगे वय २७सध्या लाँकडाऊनमुळे धानोरा येथे घरी आला होता. विनायक सोबत काकाचा मुलगा सोबत आला होता. तेजस गाडगे वय १८वर्षी तोही सोबत होता विनायक यांचे मामा नामदेव वानखडे वय ४३वर्ष हे मलकापूर तालुक्यातील दाताळा.येथून 
आपल्या. बहिणीला लग्न समारंभासाठी न्यायला धानोरा येथे आले होते. मामा आणी भाचे हे तिघे जण उन्हाळा असल्याने धानोरा येथील असलेल्या धरणावर फिरायला गेले होते व ऊन तापत असल्याने  पाण्यात  पोहण्यासाठी उतरले होते. नातेवाईकांनी  धरण (महासिध्द येथील लघु प्रकल्प ) फिरायला गेले अजून पर्यंत आले नसल्याने धरणाकडे जावून बघितले असता त्यांचे कपडे आणी मोबाईल फोन पाण्याच्या काठावर आढळून आले.  तेजस ,विनायक , नामदेव याचा शोध घेतला असता शोध लागला नसल्याने तोवर पर्यंत सांयकाळ झाल्याने अंधारात मृथकांचा शोध लागला नाही आज १८मे रोजी सकाळी शोध घेतला असता तिघांचेही मृतदेह धरणाच्या पाण्यामध्ये तरंगताना दिसून आले. यानंतर पोहणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले असुन जळगाव जामोद  येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी तिघांचेही मृतदेह पाठविण्यात आले आहे पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहे. धानोरा गावात शोककळा पसरली आहे.