घाटंजीत रंगणार रांगोळीचा कलाविष्कार; २० सप्टेंबरला भव्य रांगोळी स्पर्धा

घाटंजीत रंगणार रांगोळीचा कलाविष्कार; २० सप्टेंबरला भव्य रांगोळी स्पर्धा

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा उपक्रम; प्रथम क्रमांकासाठी ५ हजार १ रुपयांचे आकर्षक बक्षीस



घाटंजी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या उत्साहाला कलात्मकतेची जोड देण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, आठवडी बाजार घाटंजी यांच्या वतीने रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ही स्पर्धा होणार असून, रांगोळीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकाचे ५ हजार १ रुपयांचे बक्षीस संजय दमडुजी राठोड, साखरा यांच्या तर्फे, द्वितीय क्रमांकाचे ३ हजार १ रुपयांचे बक्षीस दि यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, शाखा घाटंजी यांच्या तर्फे, तर तृतीय क्रमांकाचे २ हजार १ रुपयांचे बक्षीस श्रीमान मारुती पाटील, मोहाडा यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. याशिवाय सहभागी स्पर्धकांसाठी इतर प्रोत्साहनपर बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.

मोबाईल, डिझाईन व स्केचला मनाई

स्पर्धेची खासियत म्हणजे सहभागी स्पर्धकांना मोबाईलवर रांगोळीचा नमुना पाहून रांगोळी काढता येणार नाही. तसेच कोणत्याही डिझाईन किंवा स्केचचा वापर न करता स्वतःच्या कल्पकतेने आणि हातानेच रांगोळी साकारावी लागणार आहे. त्यामुळे स्पर्धकांच्या कलात्मक कौशल्याला आणि सर्जनशीलतेला विशेष महत्त्व मिळणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेमुळे घाटंजी शहरात कलात्मक वातावरण निर्माण होणार असून, रांगोळीप्रेमींसाठी ही स्पर्धा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
91304 14149 | 88056 85458 | 8010837179

Post a Comment

0 Comments