मारेगावच्या राजकीय मैदानात शिवसेनेचा 'धुमधडाका'! विरोधी गोटात खळबळ; मोठ्या पक्षप्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली
सम्राट हॉटेलमध्ये भव्य पक्षप्रवेश; पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत विशाल भाऊ किन्हेकार यांच्या नेतृत्वावर युवकांचा शिक्कामोर्तब
मारेगाव: सचिन मेश्राम
यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय भाऊ राठोड यांच्या ध्येयवेड्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना तालुकाप्रमुख विशाल भाऊ किन्हेकार यांच्या 'फायरब्रँड' शैलीतील पुढाकारामुळे मारेगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आर्णी रोडवरील 'सम्राट हॉटेल' यवतमाळ येथे आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात तालुक्यातील शेकडो युवकांनी आणि दिग्गज पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा (शिंदे गट) भगवा खांद्यावर घेत थेट 'शक्तिप्रदर्शन' केले. या ऐतिहासिक पक्षप्रवेशाने विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला असून, मारेगाव तालुक्यात आता शिवसेनेचा प्रभाव अधिकच आक्रमक झाला आहे.
विरोधी पक्षात पडली मोठी फूट
एकीकडे विरोधी पक्ष आपली ताकद टिकवण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे शिवसेनेने एकाच फटक्यात तालुक्यातील अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात खेचले आहे. मयूर ठाकरे, अरुण आस्कर, किशोर नामदेव मंदे, चेतन चामाटे, गोविंदजी माढरे, अनिल चिंचोलकर, प्रज्योत गाऊत्रे, रक्षित शेंडे यांच्यासारख्या तडफदार नेत्यांनी इतर पक्षांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केल्याने विरोधी गटाचे धाबे दणाणले आहेत. या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय वारे आता पूर्णपणे शिवसेनेच्या दिशेने वाहू लागले आहेत.
विकासाच्या प्रवासाला मिळाली नवीन गती
"मारेगावच्या विकासाचा ध्यास आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारे नेतृत्व" अशी ओळख असलेले पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील युवाशक्ती आज एकवटली. तालुकाप्रमुख विशाल भाऊ किन्हेकार यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निर्माण केलेल्या विश्वासार्हतेमुळेच हा अभूतपूर्व पक्षप्रवेश शक्य झाला. या प्रसंगी दिपक भाऊ कोकास,जीवन भाऊ काळे, संजय आवारी, किसन पाटील मत्ते, प्रशांत भाऊ भंडारी, आशिष कुळसंगे, योगेश नागोसे, सतिश खोके, राजु ठेंगणे आणि धनराज भट्ट यांची प्रमुख उपस्थितीने या सोहळ्याची उंची अधिकच वाढली.
युवाशक्तीचा 'भगवा' संकल्प
पहापळ आणि मारेगाव विभागातील नव्या दमाच्या ३६ युवकांनी घेतलेली शपथ ही आगामी काळातील मोठ्या बदलाची नांदी आहे. यात पहापळ विभागातील राजेंद्र ठावरी, आशिष ठावरी, विठ्ठल ठावरी, गणेश पायघन, प्रशांत आवारी, हरिप पायघन, नंदकिशोर भोयर, विठ्ठल पायघन, बंडूजी मिलमाले, संदीप नांदे, विकास नांदे, स्वप्नील इखार, शुभम चौधरी, शुभम येरकाडे, प्रज्वल खोके, सुदर्शन शेंडे, तर मारेगाव विभागातील आशिम शेख, सौरभ ठाकरे, आकाश वाघाडे, कुंदन ताजणे, प्रथम काळे, प्रद्युम्न बुरुजवाडे, लक्ष्मण वासनाके, राहुल नागोसे, अजिंक्य कोरडे, आकाश निलगुडवार, निलेश भोयर, अजय आत्राम, राहुल कुळमेथे, तन्मय सरोदे, रक्षक शेंडे, गौरव भादिकर, गणेश पचारे, आर्यन मांडवे, कुणाल पिंपळशेंडे आणि शांतनु सोयाम यांचा समावेश आहे.
विशाल भाऊ किन्हेकार यांच्या नेतृत्वाखाली आता विकासपर्व!
या ऐतिहासिक प्रवेशानंतर बोलताना तालुकाप्रमुख विशाल भाऊ किन्हेकार म्हणाले की, "आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे ध्येय हे केवळ राजकारण करणे नसून, मारेगावच्या घराघरात विकास पोहोचवणे हे आहे. विरोधी पक्षांनी आतापर्यंत केवळ आश्वासने दिली, पण आम्ही प्रत्यक्ष कामाच्या जोरावर लोकांचे प्रेम कमावले आहे. पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या आशीर्वादाने आणि या नव्या युवाशक्तीच्या जोशाने आता आम्ही मारेगावचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी सज्ज आहोत."
या भव्य कार्यक्रमाने हे सिद्ध केले आहे की, मारेगावची राजकीय दिशा आता पूर्णपणे विशाल भाऊ किन्हेकार आणि शिवसेनेच्या बाजूने झुकली असून, इतर राजकीय पक्षांसाठी हा एक मोठा 'राजकीय धक्का' मानला जात आहे.
0 Comments