मार्डा डॅम खून प्रकरण: मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; फरार असलेल्या दोन मुख्य आरोपींना अटक
मारेगाव (सचिन मेश्राम)
मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दंडगाव शिवारात, मार्डा डॅमजवळ एका ४५ ते ५० वयोगटातील अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. अत्यंत गुंतागुंतीच्या असलेल्या या खुनाच्या प्रकरणाचा मारेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तपास करून सुरुवातीला ३ आरोपींना गजाआड केले होते. मात्र, या हत्येमागे आणखी काही जणांचा हात असल्याची खात्रीशीर शंका पोलिसांना होती. याच संशयावरून अधिक तपास करत असताना, मारेगाव पोलिसांनी आता उर्वरित दोन फरार आरोपींनाही त्यांच्या घरून अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
दंडगाव शिवारात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्यानंतर मारेगाव पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. मारेगाव आणि शिरपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने २४ तासांच्या आत ३ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली होती. या आरोपींना तेव्हाच यवतमाळ कारागृहात रवाना करण्यात आले होते. तरीही, या गुन्ह्यात अन्य दोन इसमांचा सहभाग असल्याची दाट शंका पोलिसांना सुरुवातीपासूनच होती.
गुप्त माहितीवरून आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पोलीस निरीक्षक सागर दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाद्वारे अखेर काल रात्री मारेगाव पोलिसांना उर्वरित दोन आरोपींचे नेमके लोकेशन मिळाले. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या राहत्या घरातून त्यांना शिताफीने अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) प्रशांत उर्फ परशु उर्फ ठमकेश्वर पंढरी घागी (वय २० वर्षे, रा. पावणा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, २) कार्तिक सुनील निकोडे (वय १९ वर्षे, रा. नागरी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर)
कारवाईत यांचा सहभाग:
सदरची धडाकेबाज कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, शंकर बारेकर, पोलीस शिपाई सागर दीपेवार आणि संभा लेणगुरे यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.
अत्यंत गोपनीय पद्धतीने तपास करून खुनाचा उलगडा केल्याबद्दल
0 Comments