मारेगाव तालुका हादरला! अंगणवाडी सेविकेचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ; नराधमावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


सचिन मेश्राम -मारेगाव 

​मारेगाव (मारेगाव वार्ता): मारेगाव तालुक्यातील एका भागात कर्तव्यावर जाणाऱ्या अंगणवाडी सेविकेला भररस्त्यात अडवून तिचा विनयभंग केल्याची आणि हीन दर्जाची जातीवाचक शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) कडक गुन्हा दाखल केला आहे.



​काय आहे 'ती' संतापजनक घटना? मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एक ५० वर्षीय अंगणवाडी सेविका आपल्या कर्तव्यावर जात असताना ही धक्कादायक घटना घडली. आरोपी अब्दुल असिम अब्दुल गफुर शेख (वय ५५, रा. मारेगाव) याने सदर महिलेचा रस्ता अडवला. आरोपीने पीडितेचा हात धरून तिला बळजबरीने रस्त्याच्या कडेला ओढत नेले आणि झटापट करून साडी व ब्लाउज फाडून तिचा विनयभंग केला. नराधमाचे एवढ्यावरच समाधान झाले नाही, तर त्याने पीडितेच्या जातीवरून अत्यंत अश्लील आणि हीन भाषेत शिवीगाळ करून तिचा अपमान केला.
​दहशतीचे सावट आणि विलंब: सदर घटनेनंतर आरोपीने पीडित महिलेच्या मनात मोठी दहशत निर्माण केली होती. पीडितेची मुले त्याच मार्गावरून ये-जा करत असल्याने, आरोपी त्यांना काही अपाय करेल या भीतीपोटी आणि समाजात होणाऱ्या बदनामीच्या धास्तीने पीडितेने आजवर तक्रार दिली नव्हती. मात्र, अखेर अन्यायाविरुद्ध हिंमत एकवटून त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशन गाठले आणि आपबिती सांगितली.
​पोलिसांची कारवाई: अंगणवाडी सेविकेच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आरोपी अब्दुल असिम अब्दुल गफुर शेख विरुद्ध विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास वणी उपविभागाचे SDPO सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
​तालुक्यात घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महिलांच्या सुरक्षेसाठी अशा नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.