मारेगाव तालुक्यात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन; अनेक दिग्गज नेत्यांचा जाहीर पक्षप्रवेश​खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास

मारेगाव तालुक्यात काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन; अनेक दिग्गज नेत्यांचा जाहीर पक्षप्रवेश

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास


मारेगाव (तालुका प्रतिनिधी): चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या नेतृत्वावर आणि काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत मारेगाव तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांनी आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा होत आहे.

यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश: काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतराव आसुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यामध्ये बोटोणी गावचे माजी पोलीस पाटील मुकुंदरावजी बदखल, माजी उपसरपंच पांडुरंगजी ढुमणे, हसनभाई (मुन्नाभाई) हभवानी, मारेगाव येथील बंडूभाऊ मेश्राम, प्रा. संतोष दुमोरे आणि बाळकृष्ण वासेकर यांनी काँग्रेसचा तिरंगा खांद्यावर घेतला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह अनेक समर्थकांनी यावेळी पक्षात प्रवेश करून आपली निष्ठा अधोरेखित केली.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती: याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजयजी खाडे, माजी महिला व बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती राजीवभाऊ कासावार यांची प्रमुख उपस्थिती होती. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा एकमेव पक्ष काँग्रेस असल्यानेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी सांगितले.

तालुका काँग्रेसची तगडी फौज: पक्षप्रवेशावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी खालीद पटेल, उदयजी रायपुरे, यादवराव पांडे, तुळशीराम पेंदोर, रविंद्र धानोरकर, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, अरविंद वखनोर, विनोद आत्राम, मंगेश ऊईके, समीर सय्यद, माणिकराव पांगुळ, गंगाधरजी ठावरी आणि रोशन हरबडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

"तालुक्यातील विकासासाठी आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर आहे. आज झालेल्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला नवी उभारी मिळाली असून आगामी काळात काँग्रेस अधिक मजबुतीने लोकांमध्ये जाईल." > — वसंतराव आसुटकर, तालुकाध्यक्ष, काँग्रेस मारेगाव.

Post a Comment

0 Comments