लोकप्रिय लोकप्रतिनिधी अन् माणुसकी जपणारे नेतृत्व: सरपंच रविराज चंदनखेडे यांचा वाढदिवस
मारेगाव (प्रतिनिधी):
राजकारणात पद मिळवणं सोपं असतं, पण लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणं कठीण असतं. आपल्या कामातून आणि साध्या राहणीमानाने मार्डी (ता. मारेगाव) परिसरातील जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले मार्डी ग्रामपंचायतीचे लोकप्रिय सरपंच रविराज चंदनखेडे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा घेतलेला हा
छोटासा आढावा...
लोकाभिमुख सरपंच
मार्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा सांभाळताना रविराज चंदनखेडे यांनी गावाच्या विकासाचा ध्यास घेतला आहे. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसोबतच गाव स्मार्ट कसे होईल, याकडे त्यांचा विशेष कल असतो. सामान्यातल्या सामान्य माणसाचे काम घेऊन कुणीही त्यांच्या दारात आले, तर त्याला रिकाम्या हाताने परत न पाठवणे हा त्यांचा स्वभाव त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरवतो.
मोठ्या भावाचे छत्र
केवळ राजकारणच नाही, तर सामाजिक बांधिलकी जपणारे आणि अनेकांसाठी 'मोठे बंधू' म्हणून पाठीशी उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. तरुणांना मार्गदर्शन करणे असो किंवा संकटकाळात कुणाच्या मदतीला धावून जाणे असो, रविराज भाऊ नेहमीच अग्रभागी असतात. त्यांच्या या प्रेमळ स्वभावामुळेच आज मार्डीसह संपूर्ण मारेगाव तालुक्यात त्यांच्या चाहत्यांचा मोठा वर्ग आहे.
शुभेच्छांचा वर्षाव
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. गौरीशंकर खुराणा (संस्थापक अध्यक्ष, जनहित कल्याण संघटना तथा सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, मारेगाव) आणि समस्त मित्र परिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
'मारेगाव वार्ता' परिवारातर्फे रविराज चंदनखेडे यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच लोकसेवा घडत राहो, हीच सदिच्छा!
*शुभेच्छुक:*
*गौरीशंकर खुराणा व जनहित कल्याण संघटना परिवार*
*तथा समस्त गावकरी, मार्डी व मारेगाव तालुका.*
0 Comments