चिखलवर्धा ग्राम पंचायतच्या पुढाकारात अमृत कलश यात्रा..

चिखलवर्धा ग्राम पंचायतच्या पुढाकारात अमृत कलश यात्रा..
------------------------------------------------


घाटंजी -राजु चव्हाण

घाटंजी - आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 'मेरी माटी मेरा देश ' या उपक्रमात घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा ग्राम पंचायतीच्या पुढाकारात दिनांक २१ सप्टेंबर रोज गुरुवारला गावातील शेतकरी,शाळेतील विद्यार्थी यांच्या रॅलीने मोठ्या उत्साहात चिखलवर्धा गावाची कलश काढण्यासाठी वाजत गाजत गावातून यात्रा काढण्यात आली.
         केंद्र सरकार स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची अमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून चिखलवर्धा ग्राम पंचायतचे सरपंच आकाश नडपेलवार यांच्या पुढाकारात स्थानिक जिल्हा परिषद शाळा,उर्दू शाळा व गावातील शेतकरी, शिक्षक व मान्यवर मंडळी यांचा सहभाग घेवून 'मेरी माटी मेरा देश ' हा उपक्रम राबविण्यात आला गावाचा कलश बनविण्यासाठी चिमुटभर याप्रमाणे मातीचे संकलन करण्यात आले.ज्यांचेकडे माती नाही अश्या कडून चिमुटभर तांदूळ घेवून मातीच्या कलशात जमा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.ग्राम पंचायत स्तरावरून एक कलश तयार करण्यात आले असून यातून उरलेल्या मातीचा उपयोग गावस्तरावर अमृतवाटिका करिता करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कलशासाठी लागणारे साहित्य गोळा करताना वाद्ये वाजवून उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यात आले होते.त्यामुळे सर्वामध्ये आनंद संचारला होता.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच आकाश नडपेलवार, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य जैतूजी मेश्राम, ग्रामसेवक प्रभुदास भगत, घाटंजी पं. स.चे शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर वांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती तर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आशिष पवार, पवन राठोड,ताराचंद लालानी,कल्पना केराम,उर्दू शाळेचे शमीम बानो,सितारा, फरोग खान,मोहसीन चव्हाण, आशाताई सेविका निताताई कनाके,जयश्री कनाके अंगणवाडी सेविका वर्षा कुडमथे, कल्पना कुलसंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे विलास नेवारे, अबरार पटेल, विठ्ठल केलझरकर रोजगार सेवक रमेश कुमरे यांनी उपस्थिती दर्शवून अथक परिश्रम घेतले. असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे सरपंच आकाश नडपेलवार यांनी कळविले आहे.