सेवानिवृत्त सैनिकाची भव्य मिरवणूक व नागरी सत्कार सोहळा संपन्न!
मित्र परिवार व नवोदय क्रीडा मंडळाचे आयोजन
राळेगाव प्रतिनिधी
लोकेश दिवे
राळेगाव शहरातली भारतीय सैन्य दलात एकवीस वर्षे सेवा देऊन भारतीय सीमेचे रक्षण करणारे सचिन एकोनकर हे सेवानिवृत्त होऊन राळेगाव शहरात स्वगृही परत आल्याने सचिन एकोनकर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने काढण्यात आली व नंतर भारतीय सैनिक सचिन एकोनकर यांचा नागरी सत्कार घेण्यात आला यावेळी कार्यक्रमांसाठी राळेगाव येथील तहसीलदार अमित भोईटे ठाणेदार रामकृष्ण जाधव सत्कार मुर्ती सचिन एकोनकर व त्यांचे कुटुंब उपस्थीत होते यावेळी राळेगाव येथील सचिन एकोनकर मित्र परिवार, नवोदय क्रीडा मंडळ माता राणी दुर्गाउत्सव मंडळ व शहीद भगतसिंग गृप व सोबत शहरातील नागरिक यांनी प्रमूख पाहुण्याच्या उपस्थितीत सचिन एकोनकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार अमित भोईटे यांनी सैन्य दलातील सैनिक हे आपले कुटुंब मित्र परिवार यांच्या पासून दुर राहून भारत सीमेचे रक्षण करतात त्यामुळे त्यांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले हा शन माझ्यासाठी पेरणादायी आहे असे त्यांनी भाषणात सांगितले.सोबत राळेगाव येथील ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी वर्दीचे महत्व उपस्थीत नागरीकांना व खेळाडूंना सांगितले.सोबतच सत्कार मुर्ती भारतीय सैनिक सचिन एकोनकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपला देशसेवेतील एकवीस वर्षाचा अनुभव सांगितला व सोबतच नवोदय क्रीडा मंडळ लायन्स क्रिकेट क्लब व आदर्श क्रिकेट क्लब यांचे मोठे मार्गदर्शन लाभले व त्यांना भारतीय सैन्यात भरती प्रक्रियेत सहभागी करण्यासाठीं नेणारे पांढरकवडा येथे पोलीस दलात कार्यरत असलेले प्रमोद जूनूनकर व मित्र परिवार यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनय मुनोत यांनी केले तर संचालन सुजित बेहरे व आभार प्रदर्शन आशिष महाजन यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन सचिन एकोनकर मित्र परिवार व नवोदय क्रीडा मंडळ यांनी केले होते.