जरंग ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अपहाराची चौकशी करण्याची प्रा. महेश राठोड यांची मागणी.

जरंग ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अपहाराची चौकशी करण्याची प्रा. महेश राठोड यांची मागणी.
------------------------------------------------

घाटंजी -राजु चव्हाण

  घाटंजी - तालुक्यातील जरंग येथील  ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सचिवाने संगमत करून पैसे काढल्याची तक्रार, ग्रामपंचायत सदस्य महेश भाऊराव राठोड याने, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ व गटविकास अधिकारी घाटंजी यांच्याकडे दिली आहे.

 सदर तक्रारीत त्यांनी सामान्य फंडाच्या खात्यामधून सरपंच सुलोचना अभिमान चौधरी यांनी दिनांक 18 / 8 / 2022 रोजी धनादेशाने (धनादेश क्रमांक 782933) 20 हजार रुपये रकमेचे स्वतः उचल केली तसेच सचिव विजय सूर्यकांत उडाके यांनी सुद्धा दि. 20 / 4/ 2022 रोजी ग्रामपंचायतच्या खात्यामधून धनादेश क्रमांक 782926 द्वारे 42 हजार 580 रुपये उचल केली. याव्यतिरिक्त सरपंच व सचिव या दोघांनी ग्रामपंचायतच्या खात्यामधून वेगवेगळ्या रकमा इतर त्रयस्त  व्यक्तीच्या नावाने काढलेल्या दिसून येत आहे. ग्रामपंचायत जरंगच्या सामान्य खात्यामधून कोणतेही विकासकामे न करता, त्या रकमेचा दुरुपयोग व गैरव्यवहार करून शासनाची दिशाभूल केल्यामुळे सरपंच व सचीव यांनी ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 14 (ग) नुसार तरतुदीचा भंग केला असल्याने त्यांच्यावर योग्य ती फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी महेश राठोड यांनी तक्रारीतून केली आहे.

 तसेच जरंग येथिल स्मशानभूमीच्या  कामाचे जवळपास तीन लाखाचे देयक जरंग येथिल सरपंच आणि सचिव यांनी काढलेले आहे, इतकेच नाही तर हे स्मशानभूमी ही सेवानगर साठी मंजूर होती, कोणताही बदल प्रस्ताव नाही, केवळ कागदोपत्री कामे दाखवून देयक काढलेल आहे. अशी माहिती  ग्रामपंचायत सदस्य प्रा. महेश राठोड यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.