राळेगाव विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा (उमेदवार तयार, नाव गुलदस्त्यात,वर्षाताई निकम यांच्या कार्यकर्त्यांना सूचना )

राळेगाव विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा

 (उमेदवार तयार, नाव गुलदस्त्यात,वर्षाताई निकम यांच्या कार्यकर्त्यांना सूचना )


राळेगाव तालुका प्रतिनिधी :

      राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात कामं करणारा सर्वसमावेशक विचारधारा असणारा पक्ष आहे. या पुढे राज्यात आपल्याला संघटन मजबूत करायचे असून यवतमाळ लोकसभा व राळेगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार आहे.त्या करीता कामाला लागा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पेरेंट बॉडी च्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 
राळेगाव येथील स्थानिक विश्राम गृहावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्षाताई निकम यांनी( दि16 ऑगस्ट )कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी 
अशोकभाऊ राऊत, सतिश भाऊ भोयर, संकेत टोणे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, निखिल गावंडे  अध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , प्रा. नालिनी ताई चौधरी, श्री बालू भाऊ कळंब कार्याध्यक्ष,भोयर, श्री संतोष वैद्य आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
                राळेगाव हा अनु. जमाती करीता राखीव असलेला मतदार संघ यावर राष्ट्रवादी ने दावा केल्याने राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटूलागले आहे.कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणे व पक्षाची भूमिका मांडणे व कार्यकारणी नव्याने गठीत करणे या करीता निकम यांचा दौरा होता. या वेळी संघटन मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
राळेगाव तालुक्यातील एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस हा मजबूत पक्ष होता. स्व. उत्तमरावदादा पाटील यांचे सोबत ऍड. प्रफुल मानकर गट राष्ट्रवादी मध्ये दाखल झाल्याने पक्षाची ताकद तालुक्यात वाढली होती. दादाच्या मृत्यू नंतर मानकर परत काँग्रेस या स्वगृही दाखव झाले आणि पक्षाचा डब्बा रिकामा झाला. त्या नंतर स्व. ऍड. फिडलं बायदानी यांनी पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. सध्यस्थीतीत शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांचे कडे पक्षाचे तालुकाध्यक्ष पद आहे. मात्र अजित पवार यांच्या बंडा नंतर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली. कोण कुठे याचा अंदाजच लागत नव्हता. या बैठकीला तालुकाध्यक्ष शशिकांत उर्फ बाळू धुमाळ हे अनुपस्थित होते. यावरून ते दादा गटा सोबत असल्याचा संदेश गेला. प्रकाश खुडसंगे हे शरद पवार गटा सोबत असल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले.
         शरद पवार गटा द्वारे राळेगाव विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी काँग्रेस ने दावा केला असला तरी उमेदवार शोधण्यापासून त्यांना तयारी करावी लागणार आहे. निवडणुका तोंडावर असतांना ही कवायद पक्ष कशी काय करणार हा प्रश्न उरतोच मात्र उमेदवार ठरलेला आहे. तॊ कार्यरत आहे. अशी सूचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस च्या वर्तुळातुन ऐकू येत असून योग्य वेळी नाव घोषित करू अशी भावना राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यक्त करतांना दिसतात.

प्रतिक्रिया 
     वर्षाताई निकम यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या वेळी लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात कामं करणाऱ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न लावून धरा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारसरणी गावा -गावा पर्यंत पोहचवा. भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणा बाबत सर्वसामान्य जनतेत संतापाची भावना आहे, येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी हा एक सक्षम पर्याय म्हणून आपल्याला जनतेसमोर जायचे आहे. या बाबत वर्षाताई निकम यांनी मार्गदर्शन केले. संघटन मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. राष्ट्रवादी काँग्रेस राळेगाव विधानसभा व यवतमाळ लोकसभा मतदार संघातून  सक्षम उमेदवार देणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.राष्ट्रवादी ची नवीन कार्यकारणी येत्या काही दिवसात घोषित होईल.
          *प्रकाश खुडसंगे*
       शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राळेगाव