घाटंजी येथील पुरग्रस्त कुटुंबास अमेझोंन कंपनी कडून मदत वाटप
------------------------------------------------
राजू चव्हाण -घाटंजी
घाटंजी - स्थानिक घाटी प्रभागातील पुरग्रस्त कुटुंबास अमोझान या जागतीक कम्पनी व् डोनेटकार्ट या जागतीक कंपनी यांनी मदतीचे पार्सल पाठविले असून ते दिलासा संस्थेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे वेळी दिलासा संस्थेच्या अध्यक्ष विजया धस तर प्रमुख अतिथी वाघाडी नदी वाचवा अभियान चे सयोंजक
प्रशांत उगले, आधार संस्थेचे नंदू डंभारे, व् सुजल धस उपस्थित होते
जुलै महिन्यात दोन दिवसात झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागात मोठे नुकसान झाले. यातच घाटंजी शहरातील वाघाडी नदी काठावरी वास्तव्यास राहणाऱ्या घाटी येथे गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. वाघाडी नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला.
या पुरामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झालेली आहे. घरात ४-५ फूट एवढं पाणी घुसल्याने घरातील अन्नधान्य संपूर्ण खराब झाले. घरातील कपडे, चादरी, पाण्यात चिखलात खराब झाले. घरातील कागदपत्रासहित वस्तू वाहून गेल्या. इलेक्ट्रिक उपकरणे पाण्यात डुबल्याने खराब झाले. या गरीब कुटुंबांना मोठं नुकसान झाल्यामुळे. घाटंजीतील दिलासा संस्था यांनी अमेझोंन कंपनी ऑनलाइन वस्तु विक्री कंपनी व् डोनेटकार्ट या कंपनी यांना सम्पर्क केला या दोन्ही कंपनी च्या संयुक्त विद्यमाने किटचे पार्सल पाठविले त्या किटचे वाटप करण्यात आले त्यामध्ये आवश्यक वस्तू बकेट , ताडपत्री,पेस्ट,ब्रश, साबण, सॅनिटरी पॅड, बाकी आवश्यक वस्तू इत्यादी वाटप केलेल्या सहित्यामध्ये होते. या कार्यक्रमाला दिलासा संस्थेच्या विजया धस व प्रशांत उगले नंदकिशोर डंभारे सुजल धस यांनी त्यांना सबोधित केले. संचालन ,राजश्री राऊत,यांनी केले कार्यक्रमा साठी कोमल धस ,अश्विन सातघरे ,रोशनी गोडे, शीला भुरगाटे, आशा वानखडे, सुनीता दरने, अर्चना जीवतोडे, यांचे सहकार्य लाभले.
यावेळी पुरग्रस्त मंडळीनी आभार मानले.