छायाचित्रकारांनी अनाथ मुलाला केली मदत
राळेगाव प्रतिनिधी : प्रशांत भगत
जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्या
गावालगत कृष्णापुर कोदुली येथे रहिवासी असलेला अनिल नारायणराव मानकर तो अपंग व आंधळा असून त्याला आई वडील नाही तो त्याच्या बहिनिकडे राहत आहे त्यांच्या कुटुंबाला सर्व युवा छायाचित्रकार संघटना राळेगाव च्या वतीने त्याला घरातील किराना व आर्थिक मदत करुन छायाचित्रकार दिन साजरा केला आहे.
आपल्या प्रत्येक सुखाःदुखाःतील क्षणांना आपल्या कॅमेऱ्या मध्ये कैद करुन ठेवणाऱ्या अध्यक्ष मनोजभाऊ वाकुलकर, उपाध्यक्ष दिनेश् हिवरकर ,कोषाध्यक्ष रोशन ईरपते ,सचिव रुषभ सेगेकर, सहसचिव सुमित कुंभारे यांच्या समवेत संघटनेचे सदस्य प्रितम धनरे समिर वाघरे,मुकुंद पवार,प्रफुल राजुरकर,स्वप्निल वाघाडे, सुमित वाघाड़े, आशुतोष सेगेकर ,हर्ष पोकळे ,परीक्षित घोड़े प्रतिक गावारकर, प्रवीण निखाड़े, आकाश डाहाळकर, प्रफुल ईरपते, भोला ईरपते,राहुल कुमरे प्रामुख्याने उपस्थितीत होते.