राळेगाव शहरातील प्रभाग बारा अवैध धंद्याचे माहेरघर
"जिकडे तिकडे दारूच दारू" शांती नगर नावानेच फेमस
राळेगाव /प्रशांत भगत
राळेगाव शहरातील सर्वात गाजलेला आणि सर्वांच्या ओळखीचा एरिया म्हणजे शांती नगर. ग्रामपंचायत च्या काळात सर्वात मोठा असलेल्या या एरियाचे नगरपंचायत च्या रचणे नुसार विभाजन करण्यात आले.
मार्केट, बस स्टॅन्ड, शाळा, कॉलेज, बँक, सर्व शासकीय कार्यालये या एरिया जवळ, एवढेच नाही तर दिवसेंदिवस हा एरिया मोठा होत असून या शांतीप्रिय नगराला मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाने ग्रासले असल्याचे विदारक दृश्य दिसत आहे. सर्व प्रकारचे अवैध धंदे याच प्रभागात बघायला मिळत असून काही दिवसापासून अवैधपणे चालू असणाऱ्या दारू च्या धंद्यामुळे "शांती नगर ची शांती भंग" झाल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
दारू च नाही तर मटका सुद्धा याच एरिया ला लागून सुरु आहे या सर्व बाबी कडे पोलीस प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून असल्याचे नागरिकांकडून बोल्या जात आहे.
पोलीस वसाहत च्या बाजूने तसेच पशुचिकित्सालय यासारख्य ठिकाणी मटके बहाद्दरांची नेहमीच गर्दी बघायला मिळते. पशुचिकित्सालय मध्ये पशु कमी तर बैठक मांडून गणीतिय आकडेवारी करताना मनुष्य प्राणी जास्त दिसत आहे. रात्रीच्या वेळेला लहान वयाची मुले सुद्धा दारू पिऊन रोड ने " मै हू डॉन, मै हू डॉन" म्हणत धिंगाणा घालताना बघायला मिळते तसेच वाढदिवस साजरा करण्याचा ट्रेंड हा तरुणाईत वाढत असून तो चक्क चौकात भर रस्त्यावर किंवा डिव्हायडर वर साजरा करताना दिसत आहे अशातच अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तर कमी पैशात कमी वेळेत रग्गड पैसा कमविण्याच्या हेतूने लहान वयाची मुले सर्वात जास्त या धंद्या कडे वळली आहे. हि सर्व चालणारी अवैध धंदे सामान्य नागरिकाला दिसत असून पोलीस प्रशासनाला का बर दिसत नाही असाहि प्रश्न जनतेला विचारात पाडताना दिसतो. अवैध असलेल्या प्रत्येक व्यवसायावर पोलीस प्रशासनाला स्वतः कारवाई करता येत असून सुद्धा तक्रारदाराची वाट का बघतात असा संतप्त सवाल नागरिकाना उपस्थित होत आहे. जो पर्यंत कोणी तक्रार करीत नाही तोपर्यंत कुठलीच कारवाई होत नाही हेच धोरण अवलंबविले असून सुद्धा कडक कारवाई होताना दिसत नाही. याच्या उलट बाहेरचे पथक येऊन कारवाई करून जाताना बघायला मिळत आहे.
शांती नगर वडार पुरा येथे मिळालेल्या माहितीवरून एका महिलेकडून खुलेआम सुरु असलेल्या दारु धंद्यावर नुकतीच कारवाई करण्यात आली तसेच याच्या आधी LCB पथकाकडून मोठा दारू साठा घरातून जप्त करण्यात आला होता. त्याचप्रमाणे शांती नगर मधील दर्गा रोड परिसरात सुद्धा अवैध दारू विक्री सुरु झाली असून संपूर्ण शांती नगर हे दारू चे माहेर घर झाल्याचे दिसत आहे. याचा मानसिक त्रास येथील नागरिकांना होत असून नेहमीची रस्त्यांवर होणारी गर्दी व तेथील नागरिकांना होणारा त्रास यामुळे गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.
काही आठवड्या आधी परत वडरपुरा येथील समस्त महिलानि निवेदन दिले कि बरेच दिवसापासून वडार पुरा जुना आणि वडार पुरा नवीन दर्गा रोड या भागात सुद्धा एका महिला व पुरुषांकडून अवैध देशी दारूची विक्री होत असून सकाळी सहा वाजेपासून ते रात्री एक वाजेपर्यंत खुल्या पद्धतीने दारूची विक्री केली जाते त्यामुळे लहान मुलं व तसेच समस्त रहिवासी महिलांना मद्यपीच्या अरवाच्य बोलण्याने त्रास सहन करावा लागत आहे मद्यपीच्या वागण्याने तेथील कमी वयातील मुलांवर व कुटुंब प्रमुखावर वाईट प्रभाव पडून कुटुंब कलह वाढण्याची भीती निर्माण झाली आहे भांडण तंटे वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे
आधीच शांती नगर मध्ये सुरु असलेली प्रत्येक अवैध दारू बंद करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून पोलीस प्रशासनाला करण्यात येत आहे.