यवतमाळ जिल्हयात रेती माफीयांनी घातलेला हैदोस त्वरीत थांबवा
मनसेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
राळेगाव -प्रशांत भगत
यवमाळ जिल्हयात गेल्या अनेक दिवसांपासुन अनेक तालुक्यात रेती माफीयांनी हैदोस घालुन शासनाची कोणतीहि पूर्व परवानगी नसतांना राजरोसपणे रेती काढुन विक्री सुरु केलेली आहे. या गोरख धंदयाला नक्की कोणाचे पाठबळ मिळत आहे. याचा कुठेहि उलगडा होत नाही. आश्र्चयाची गोष्ट म्हणजे अनेक तालुक्यामध्ये रात्रीच्या वेळेला ट्रक भरून सर्रास रेती तस्करी केली जाते. अनेक अरुंद रस्त्यावर भरधाव वेगाने ट्रक चालविले जातात आणि
अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेच्या पैशातुन तयार केलेले रस्ते अवजड वाहतुकीमुळे दयनिय परिस्थितीत आलेले आहे. त्यामध्ये सर्वसामान्याचा कोणताही दोष नसतांना त्यांना रस्त्याने जाणे-येणे करणे शक्य होत नाही. एवढयावर रेती माफीया थांबलेले नाहीत तर गाव खेड्यातुन त्यांच्या विरोधात कोणीही आवाज उठवु नये म्हणुन त्यांच्यावर दडपण सुध्दा आणले जाते. याबाबतची सुध्दा माहिती प्राप्त झालेली आहे. अशा परिस्थिती मध्ये गौण खनिजा व्दारे शासनाला मिळणारा महसुल सुध्दा प्राप्त होत नाही. या सर्वांकरिता नेमक कोण जबाबदार आहे याची शहानिशा करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ती आपण करुन संबंधीतांवर त्वरीत कार्यवाही करावी व याबाबतचे आदेश आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकारी तसेच पोलिस विभाग यांना सुध्दा द्यावी.
या ठिकाणी विशेषतः आर्णि, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, घाटंजी, यवतमाळ, मारेगाव, म्हणजेच एकुण १६ हि तालुक्यात सर्रास पणे नदी-नाल्यातुन अवैध रित्या रेतीचा उपसा करुन त्याची विक्री सुरु आहे व त्याव्दारे सर्वसामान्यास जनतेची लुट करण्याची एकहि संधी रेती माफीया कडुन सोडली जात नाही असे निर्दशनास येत आहे. त्यामुळे आपणास या निवेदानाव्दारे कळविण्यात येते की, या संपुर्ण प्रकार थांबविण्याबाबत त्वरीत योग्य ती पाऊले उचलावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या यंत्रेनेमार्फत अशा प्रकारची अवैध धंदे बंद करणे करिता समोर येईल आणि त्या परिस्थितीत उद्भवणा-या परिणामास शासकीय यंत्रणा जबाबदार राहिल. त्याच प्रमाणे या सर्व प्रकारामध्ये तहसिलदार, मंडळ अधिकारी, पटवारी, यांच्या संगणमताने हे सर्व अवैध धंदे सुरु आहे. असे सुध्दा ठाम मत समोर येत आहे या गंभिर मताचा आपण योग्य तो विचार करावा व त्वरीत कार्यवाही करावी.
या प्रकारचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले या प्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिरामवार , शहर अध्यक्ष अॅड. अमित बदनोरे , अभिजित नानवटकर महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेना यवतमाळ , गौरव दरने मनविसे कळंब ,यवतमाळ शहर उपाध्यक्ष प्रथमेश पाटील , शहर सचिव तुषार चौडके , विभाग अध्यक्ष ओम् राठोड , यश शृंगारे , अमितेश आडे , राहुल चिंचोळकर , अंजेष कालंकार यांच्या सह यवतमाळ शहरातील व तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते