शिवसेनेचे तालुका प्रशासनाला साकडे; ओला दुष्काळ जाहीर करा
प्रतिनिधी- प्रशांत भगत
राळेगाव तालुक्यातील सतत तिन दिवसाच्या पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाले, सर्व शेती पुर्णता खरडुन गेली हातात आलेले पिक वाहुन गेले. काही गरीब कुटुंबातील घरे अक्षरशः सतत पाऊस असल्याने वाहुन गेले.त्याचे कोणत्याही प्रकारचे पंचणामा अथवा चौकशी झाली नाही याबाबत आज रोजी मा.तहसीलदार साहेब अमितजी भोईटे यांना रितसर निवेदन देण्यासाठी राळेगाव तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी यांनी त्वरीत पंचणामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात यावी या प्रमुख मागणी सह राळेगाव शहरात शिव भोजन थाळी दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे त्या मुळे गरिब वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे त्या बद्दल सुद्धा चर्चा करण्यात आली.
तहसीलदार साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आपले निवेदन शासनास पाठवुन आपणास योग्य न्याय मिळेल असे अभिवचन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला तहसीलदार साहेबांनी दिले. उपस्थितीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख विनोद भाऊ काकडे, शहर प्रमुख राकेश भाऊ राऊळकर, शहर संघटक इमरान पठाण, व्यापारी आघाडीचे शहर प्रमुख सुनिल क्षिरसागर, युवा सेनेचे योगेश मलोंडे,उप शहर प्रमुख महिंद्रा तुमाणे,उप शहर प्रमुख दिपक येवले सिमरण इमरान पठाण नगरसेविका तथा महिला बाल कल्याण सभापती,सौ.वर्षाताई मोघे(तालुका प्रमुख महिला आघाडी) विजय पाटील, सुनिल सावरकर, सुरेंद्र भटकर, अमोल राऊत,वृषभ दरोडे, गणेश जांभुळकर, अमोल देवतळे ,अखिल निखाडे, शंकर भाऊ गायधने ,अंकुश गेडाम, रोशन उताणे, नितिन नेवारे, महादेव पोंगडे, संदिप गेडाम, धनंजय चामलाटे, चेतन शिंदे, घनशयाम शिंदे, गजानन तिवसे, प्रकाश तिवसे, सह शिवसेनेचे तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.