मणिपूर मध्ये झालेल्या अत्याचार विरोधात बिरसा ब्रिगेडनि दिले मा. जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन

मणिपूर मध्ये झालेल्या अत्याचार विरोधात बिरसा ब्रिगेडनि  दिले  मा.  जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन



प्रतिनिधी: प्रशांत भगत 

मणिपूर राज्यात आदिवासी महिला सोबत झालेली हिंसा निंदनीय व अमानवीय असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हा एकमेव पर्याय असून राज्यात सतत घटना घडत असून सरकार यावर कुठलीच कडक कारवाई करताना दिसत नाही, मणिपूर राज्यात दोन जमाती असून आदिवासी लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसापासून मणिपूर येथे दंगली घडत असून आदिवासी महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढल्या जात आहे तसेच आदिवासी माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक यांच्या महिलांना सुद्धा सोडले नाही त्यांचा छळ करून मारून, जाळून टाकण्यात येत आहे त्यांची मकाने सुद्धा जाळन्यात आले आहे, शासन प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. आदिवासी हा मूलनिवासी असून त्यांना हाकलून त्यांच्या जमिनी, जंगले  हडपण्याचा  प्रयत्न केला जात आहे. हजारो आदिवासी मारण्यात आले, तेथील आदिवासी सरकार पाडायचे, मणिपूर राज्यातून या लोकांना हाकलून लावायचे असे दुरदर्शन मध्ये ऐकण्यात येत आहे असे सांगण्यात आले आहे, यासाठी घडलेल्या घटनेच्या  विरोधात न्याय मिळून देण्यासाठी तेथील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करून गुन्हेगारावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन बिरसा ब्रिगेड कडून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना  निवेदन देण्यात आले. यावेळी  बिरसा ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष अरविंद कुडमेथे, बाळकृष्ण गेडाम, व्ही एन कन्नाके, गौरव पधरे, सुरज मरस्कोल्हे, राहुल मसराम, व इतर  अधिवासी बांधव उपस्थित  होते