८०० वर्षांच्या ‘प्रेयसी सोबत झोपणारा ज्युलिओ ताब्यात

८०० वर्षांच्या ‘प्रेयसी सोबत झोपणारा ज्युलिओ ताब्यात


एका ८०० वर्षांच्या ममीला आपली गर्लफ्रेंड समजून तिच्यासोबत बेडवर झोपणाऱ्या व्यक्तीचे सत्य अखेर समोर आले असून त्याच्याजवळ आढळलेल्या ८०० वर्षाच्या ममीला तो प्रेयसी मानत होता. त्याचे नाव ज्युलिओ असल्याचे समोर आले आहे .

पोलिसांना त्याच्याजवळ एक प्राचीन ममी सापडली आहे. ही ममी अर्थात जतन केलेला मृतदेह 600 ते 800 वर्षे जुनी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्युलिओच्या घरात ममी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी ही ममी ज्युलिओ याच्या बेडरुममध्ये तो झोपत असलेलल्या बेडवरच ठेवलेली पोलिसांना दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने अजब उत्तरे दिल्याने पोलीस देखील अचंबित झाले.

या ममीला ज्युलिओ आपली प्रेयसी मानत होता. ही ममी माझी आध्यात्मिक प्रेयसी असून तो या ममी सोबतच झोपत होता. त्याच्या वडिलांनी त्याला ही ममी दिली होती. मागील 30 वर्षांपासून त्याच्या कुटुंबातच ही ममी ठेवण्यात आली होती. मात्र, त्याच्या वडिलांकडे ही ममी कुठून आली, याची कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. सध्या पोलिसांनी ज्युलिओ आणि त्याच्या काही मित्रांसह अटक केली आहे.