कारच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी
मांगरूळ येथील घटना
मारेगाव-सचिन मेश्राम
मारेगाव : मांगरूळ गावच्या हद्दीतील वणी -मारेगाव महामार्गावरील वेगाव फाट्यावर आज शुक्रवार दि.४ नोव्हेंबर रोज सकाळी दहा वाजल्याच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कारने एक वृद्ध महिलेला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात वृद्ध महिला
गंभीर जखमी झाली आहे.
पांढरकवडा येथून वणीकडे चाललेल्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच.२९ ए आर ३७६३ ) ने नानीबाई अंबादास निब्रड (वय ६०, रा. कोलगाव) यांना जोरदार धडक दिली त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहे. त्यांच्यावर वणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.