बुलढाणात कार व लक्झरीचा भीषण अपघात; चाळीसगावचे ३ ठार, २ जखमी

बुलढाणात कार व लक्झरीचा भीषण अपघात; चाळीसगावचे ३ ठार, २ जखमी


बुलढाण्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. साखरपुड्यासाठी जाणाऱ्या कुटूंबाच्या अल्टो कारची आणि लक्झरीची जोरदार धडक झाली. हा अपघात मेहकर आणि डोनगाव रस्त्यावर झाला. या भीषण अपघातात चाळीसगाव तालुक्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.
हा भीषण अपघात चाळीसगावकडे येत असताना झाला. या अपघातात इंदल चव्हाण (वय ३८, रा. सांगवी ता. चाळीसगाव), योगेश विसपुते (वय ३२, रा. चाळीसगाव), विशाल विसपुते (वय ३८, रा. चाळीसगाव) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ज्ञानेश्वर रघुनाथ चव्हाण, मिथुन रमेश चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कार लक्झरीमध्ये पूर्णतः अडकून गेली होती. कारमधील मृत व जखमींना बाहेर काढणे देखील कठीण झाले होते.