तरुणाने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
प्रतिनिधी | दिग्रस
तालुक्यातील गांधीनगर येथील एका १७ वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची बाब आज रविवार ,दि. २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. सूरज उर्फ चिकू राजू धोत्रे असे मृतकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, मृतक सूरज उर्फ चिकू राजू धोत्रे (वय -१७) रा.गांधीनगर हा आपल्या वडिलासोबत चांदुरबाजार येथे रोजमजुरीच्या कामाला होता.तो ३ ते ४ दिवस आधी आपल्या गांधीनगर येथे आईला भेटायला आला होता.अशातच त्याने गांधीनगर गावातील हनुमान मंदिराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तेव्हा ही बाब तेथील नागरिकांना लक्षात आली तेव्हा ग्रामस्थांनी त्याला विहिरी बाहेर काढून दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणले. मृतकाच्या पश्चात आई,वडील , भाऊ असा परिवार आहे. त्याने आत्महत्या सारख्या टोकाची भूमिका का घेतली हे अद्याप कळू शकले नाही.
-- चौकट --
मृतकाला नातेवाइकांनी दिग्रस ग्रामीण रुग्णालयात आणले असून मृतकाचे वडील हे चांदुरबाजार येथे रोजमजुरीसाठी राहत असल्याने त्यांना येण्यास वेळ लागणार असल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन उदयाला होणार असल्याने ग्रामीण रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी शितपेटीची व्यवस्था नसल्याने नातेवाइकांनी स्वतः शितपेटी आणली. व त्यामध्ये मृतदेह उद्यापर्यत ठेवण्यात येणार असून त्याचे वडील आल्यावर त्या मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे. यावेळी उपस्थित नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात शितपेटीची सुविधा उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त केली. तेव्हा संबंधित वरिष्ठांनी ग्रामीण रुग्णालयात शितपेटीची व्यवस्था करून मृतदेहाचे अहवेलना होणार नाही याबाबत काळजी केली पाहिजे अशी प्रतिक्रिया उमटत होती.