ट्रॅक्टरच्या धडकेत मुलगी ठार
पुलगाव, : नजिकच्या इंझाळा फाट्याजवळ ट्रॅक्टरच्या धडकेने मोटर सायकल ने प्रवास करणारे हे कुटुंब गंभीर जखमी झाले असून लहान मुलगी गतप्राण झाली आहे.
तळणी तालुका धामणगाव जिल्हा अमरावती येथील रहिवासी असलेले शिवा नथ्थु मायनर वय 23 देव का शिवा मायनर व १९ व कुमारी नायरा शिवा मायनर वय नऊ महिने हे लग्नाकरिता राळेगाव येथे जात असताना इंझाळा फाट्याजवळ त्यांना एका ट्रॅक्टरने धडक दिली यात शिवा व देवका हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी वर्धा येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला तर त्यांची मुलगी कु. नायरा ही गतप्राण झाली आहे.