सतर्कतेचा इशारा... महाराष्ट्राला पुन्हा कोरोनाचा धोका

सतर्कतेचा इशारा... महाराष्ट्राला पुन्हा कोरोनाचा धोका

    
 

मुंबई,कोरोना संपला असं वाटत असतानाच कोरोनाच्या नव्या विषाणूने अनेक देशात पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. इस्त्रायलसह अन्य काही युरोपीयन देशात  मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. वाढता आलेख बघता जगभर चिंता व्यक्त केली जात आहे.
आठवड्याला 8 ते 10 टक्क्यांनी  केसेसमध्ये वाढ होत आहे. नव्या व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग बघता राज्य सरकार देखील सतर्क झालं आहे. राज्याच्या सार्वजनिक विभागाचे प्रधान सचिव प्रदिप व्यास  यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सध्यस्थितीची माहिती देणारे पत्रक व्यास यांनी जारी केले आहे. सध्या अवघ्या दोन हजार सक्रिय रूग्णांमुळे स्थिती नियंत्रणात आहे. मात्र अवघ्या काही आठवड्यांतच यात लक्षणीय वाढ होऊ शकते, असा इशारा व्यास यांनी राज्याला या पत्रकातून दिला आहे.

दरम्यान, दक्षिण आशियासह युरोप आणि चीनमध्येही  पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन वर्षात दिसली नाही, इतकी वाढ गेल्या 24 तासात काही देशात नोंदवली गेली आहे. त्यात मास्कचा वापर, गर्दीवर नियंत्रण, लसीकरण याबाबत आपण राष्ट्रीय सरासरीच्या मागे असल्याने व्यास यांनी भीती व्यक्त केली आहे. महाराष्ट्राला पुन्हा धोका