अवैध दारूवर पांढरकवडा पोलिसांची धडक कारवाई ; 24000 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/ वाजीद कुरेशी
प्रतिनिधी | दि 18 | महाराष्ट्र ढाबा धारणा इथ नाकाबंदी दरम्यान पांढरकवडा पोलिसांनी अवैध दारू वाहतूक करणाऱ्या मारोती झेन कार अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहितीच्या आधारे धाड टाकून पोलीस उपनिरीक्षक संदिप बारींगे यांच्या पथकाने सापडला रचुन धडक कारवाई केली. अवैध देशी दारूच्या 6 बॉक्स घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केल्या अगदी शिताफीने अवैध दारू वाहतूक करण्याचा प्रयत्न दारू माफियांकडून करण्यात आला. मात्र, पांढरकवडा पोलीसांनी हा डाव दि. 17 मार्च रोजी उधळून लावत अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई केली आहे. करंजी येथील येथील गर्जन खैरे यांच्यावर दारू बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23हजार 280 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला असून मात्र वाहन चालक गर्जन खैरे हा मारोती कार पसार होण्यात यशस्वी झाला असून ही कारवाई पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. खडेराव धरणे पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदिप पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार पोलीस उपनिरीक्षक संदीप बारिंगे, पोलिस बीट जमादार प्रमोद जुनूनकर पोलीस शिपाई उमेश कुमरे यांनी ही धडक कारवाई केली.