मारेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत‌ नगरसेवक पदी राजु ठेंगणे तर शंकरराव मडावी यांची अविरोध निवड

मारेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत‌ नगरसेवक पदी राजु ठेंगणे तर शंकरराव मडावी यांची अविरोध निवड


 


मारेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत‌ नगरसेवक पदी शिवसेना पक्षाचे राजु ठेंगणे तर  काँग्रेस पक्षाकडुन अविरोध स्वीकृत नगरसेवक पदी शंकरराव मडावी यांची निवड

आज नगरपंचायततीच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी सोमवारी दि .21 रोजी  नगरपंचायत सभागृहत विशेष सभा घेण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी शरद जावळे ,मुख्याधिकारी यांच्या कडे स्विकृत नगरसेवकपदासाठी शिवसेने कडुन राजु ठेंगणे तर  भाजप कडून शोभाताई नक्षणे व काँग्रेस पक्षाकडून शंकरराव मडावी यांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेना पक्षाचे उमेदवार राजू ठेंगणे व भाजपच्या उमेदवार शोभाताई नक्षणे यांची सदस्य संख्या समान असल्याने ईश्वर चिठ्ठी काढुन  राजु ठेंगणे यांना स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आले तर काँग्रेस पक्षाकडून शंकरराव मडावी यांची अविरोध  स्विकृत सदस्यपदी निवड करण्यात आली
 काँग्रेस पक्षामध्ये कभी खुशी कभी गम असल्याचे दिसून येत आहे.