कळंबला दोन तरुणांना चिरडले
कळंब इथूनच जवळ असलेल्या पिंपळगाव येथील तीन तरुण पहाटे 5 च्या दरम्यान व्यायाम करण्याकरिता गावाबाहेर आले होते. कळंब बाभुळगाव रस्त्यावर ते आष्टी चौफुली येथे व्यायाम करत होते. त्यापैकी दोघांना रस्त्याच्या काठावर व्यायाम करत असताना एका अज्ञात आयशर वाहनाने धडक देऊन चिरडूनच टाकले. तिसरा थोडा बाजूला गेला असल्याने थोडक्यात बचावला.
विवेक वासुदेव ठाकरे (वय 43) आणि अमोल बबन गाडेकर (वय 38, रा. दोघेही पिंपळगाव) यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कळंब पोलिस घटनास्थळी पोहोचले. तक्रारकर्ता पंकज सुरेश उईके याच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला असून भादंवि 289, 304 अ, 134 मोटर वाहन अधिनियम या कलमांतर्गत अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे