गांजा उत्पादक शेतकर्‍याला दोन दिवसांची पोलिस कोठडी

गांजा उत्पादक शेतकर्‍याला दोन दिवसांची पोलिस कोठडी

   दिग्रस तालुक्यातील घटना

 

दिग्रस तालुक्यातील रामगाव डोर्ली येथील एका शेतात गांजा वनस्पतीचे उत्पादन घेत असलेल्या एका शेतकर्‍याला दिग्रस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या शेतकर्‍याला दिग्रस न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

तालुक्यातील रामगाव डोर्ली या गावाजवळून 1 किमी अंतरावर सुरेश आडे यांच्या शेतात गांजाची झाडे असल्याची गोपनीय माहिती दिग‘स पोलिसांना मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर, ठाणेदार सोनाजी आम्ले, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यवतमाळ व दिग्रस पोलिसांनी रविवार 28 नोव्हेंबरच्या रात्री धाड मारून शेतात तूर व कपाशीच्या ओळींमध्ये असलेली व पूर्ण वाढ झालेली गांजाची 43 झाडे मुळासकट उपटून जप्त केली.

यावेळी शेतकरी सुरेश आडे याला दिग्रस पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोमवार,29 नोव्हेंबरला सुरेश आडे याला दिग्रस न्यायालयात हजर केले असता दिग्रस न्यायालयाने त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास ठाणेदार सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात दिग‘स पोलिस करत आहेत.