गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
खंडणी येथील घटना
मारेगाव: तालुक्यातील भुरकी पोड (खंडणी) येथील हरिदास रामपूरे (५०) या इसमाने खंडणी व भुरकी पोड शिवाराच्या मध्ये जंगल असलेल्या परिसरात झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.१७नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी ७:३०वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे.
याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी मारेगाव पोलीस ठाण्याला दिली. हरिदास वसंता रामपुरे यांना पोटाचा त्रास होत. असल्याने आत्महत्या केली असल्याचा अंदाज नातवाईकांनी यावेळी आहे.
याबाबतची माहिती मिळताच मारेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हरिदास यांच्या पश्चात पत्नी, 3मुली 1मुलगा असा आप्ते परिवार पाठीमागे आहे.