जीपचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

जीपचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू



 


सोलापूर,  जीपचा टायर फुटल्याने अक्कलकोटहून सोलापूरला जाणाऱ्या जीपचा भीषण अपघात  झाला आहे.  हा अपघात इतका भीषण होता की अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातात 10 ते 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत.
जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताच्या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अक्कलकोटहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या क्रुझर जीपचा टायर फुटला. गाडीचा टायर फुटल्याने जीप पलटून  हा अपघात झाला आहे.