हिमायतनगर न.प मधील ई निविदेत अधिकारी व निविदा धारकांची संगनमत !
सहभागी झालेल्या कंत्राटदारांचा आरोप
जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी
हिमायतनगर प्रतिनिधी भगवान कदम
नगर पंचायत हद्दीतील घनकचरा कामासाठी ई-निविदा सूचना 2021-22 साठी प्रशासनाने घेतलेल्या सहा निविदा धारका पैकी श्री नागरिक सेवा सहकारी संस्था, बी.के.एन. एस.एस.एस.अमरावती व पल्लवी एंटरप्रायझेस ह्या तीन निविदा धारकांना हिमायतनगर नगर पंचायतचे अधिकारी यांनी ना-ना कारणे दाखवत राजकीय दबावाला बळी पडून त्यांना अपात्र ठरवले व बेरार इजीनिअरिंग प्राईव्हेट लिमिटेड, टेरामेरा इंडिया प्राईव्हेट लिमिटेड सह " नागराल इंडिया प्राईव्हेट लिमीटेड " ह्या कंत्राटदार संस्थेचे नाव अगोदरच काळ्या यादीत असल्याने येथील अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमाना बगल देऊन कायदेशीर प्रक्रिया न करता निविदेत सहभागी असलेल्या कंत्राटदारांना पात्र ठरवले आहे त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी यांनी तात्काळ ह्याची चौकशी करून ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी सहभागी असलेल्या कंत्राटदारानी केली आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर नगर पंचायत हद्दीतील घनकचरा विषयक कामासाठी ई- निविदा सूचना क्रमांक 01/2021-22 नुसार दि 10/09/2021 रोजी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती या निविदेत खालील सहा निविदा धारकांनी निविदा भरल्या होत्या त्यात 1)बेरार इजीनिअरिंग प्राईव्हेट लिमिटेड 2)बी.के.एन. एस.एस.एस.अमरावती 3)" नागराल इंडिया प्राईव्हेट लिमीटेड " 4)पल्लवी एंटरप्रायझेस 5)श्री नागरिक सेवा सहकारी संस्था सह 6) टेरामेरा इंडिया प्राईव्हेट लिमिटेड या निवीदा धारकांनी या निविदेत सहभाग घेतला होता त्या पैकी तीन निविदा धारक कंत्राटदारास हिमायतनगर नगर पंचायतचे अधिकारी यांनी राजकीय दबावाला बळी पडून ना- ना अनावश्यक कारणे देऊन ह्यातील अनुभवी संस्थाना अपात्र ठरून इतर तिघांना पात्र ठरवले आहे त्या पात्र ठरवलेल्या संस्था पैकी बेरार इजीनिअरिंग प्राईव्हेट लिमिटेड व टेरामेरा इंडिया प्राईव्हेट लिमिटेड या दोघांचया ब्यालेंनस सीट आणि नेटवर्क सर्टीफिकेट मध्ये तफावत आहे तर " नागराल इंडिया प्राईव्हेट लिमीटेड " या संस्थेचे नाव चक्क अंबड नगर परिषदे मध्ये काळ्या यादीत असताना सुद्धा हिमायतनगर नगर पंचायतची दिशाभूल करून सबंधित कंत्राटदाराने खोटे शपथ पत्र देऊन ह्या निविदेत भाग घेतला आहे त्यामुळे शासनाच्या नियमानुसार ही पूर्ण सपर्धा झाली नसल्याने कायदेशीर रित्या ही निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी सहभागी कंत्रादारांकडून करण्यात आली आहे ह्याची उच्च स्तरिय चौकशी करून " नागराल इंडिया प्राईव्हेट लिमीटेड " या कंत्राटदार संस्थेला अंबड नगर परिषदेने दि 22/07/2021 रोजी काळ्या यादीत टाकले असल्याचे पुरावे देऊन संबंधिताने हिमायतनगर नगर पंचायतची फसवणूक करत त्यांचे नाव काळ्या यादीत नसल्याचे खोटे शपथपत्र देत निविदेत भाग घेतल्या प्रकरणी वरील संस्थेवर I.P.C धारा 420 नुसार कायदेशीर कार्यवाही करावी व सदर निविदा फेटाळून लावावी व या सस्थे वर गुन्हा दाखल न केल्यास नगर पंचायत कार्यालय व आपल्या कार्यालयाचे कर्मचारी व अधिकारी व सवछता इजिनियर विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला आहे
चौकट
हिमायतनगर नगरपंचायत मध्ये पहिला टेंडर कॉल आला तेव्हा बी.ओ.क्यू लॉक केल्याचे पुरावे सुद्धा संबंधित कंत्राटदाराकडे आहेत या भीतीपोटी संबंधित नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांने ते टेंडर कॅन्सल केले होते अशी ई-निविदा रद्द करण्याची ही तिसरी घटना आहे त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी साहेब यांनी या बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन हिमायतनगर नगरपंचायतीच्या अधिकाऱ्याकडून होत असलेल्या बे जबाबदार पना विरोधात कार्यवाही करावी असे मत हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले आहे
"हिमायनगर नगरपंचायती मधील प्रशासकाच्या कारभारा विरोधात अनेक नागरिकांनी तक्रारी देऊन सुद्धा त्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही त्यासाठी येथील न. प.वर कायमस्वरूपी मुख्याधिकारी यांची नेमणूक करून येथील प्रशासनाला शिस्त लावावी अशी मागणी नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जावेद अब्दुल गणी यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना केली आहे "