हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या
गोर सेना व बंजारा समाज बांधवांनी कँडल लावून नोंदविला निषेध
दिग्रस/प्रतिनिधी
हैदराबाद, तेलंगणा येथील सिंगारणी कॉलनीत अवघ्या सहा वर्षाच्या चैत्रा नामक बंजारा समाजातील चिमुरडीवर एका तरुणाने बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेच्या आणि मुंबईतील साकिनाका येथील घटनेच्या निषेधार्थ गोर सेना आणि अन्य सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कँडल लावून निषेध नोंदविला.
या दोन्ही घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन त्वरित पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी यावेळी समाज बांधवांनी केली.चैत्रा ही अवघी सहा वर्षाची मुलगी होती.तिला कोणत्याही गोष्टीची समज नसताना एका नराधमाने तिच्यावर पाशवी बलात्कार केला.त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.या घटनेचा निषेध नोंदवत गोर सेना व अन्य सामाजिक संघटनेनी कँडल लावून तिला श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी बंजारा समाजातील बहुतांश महिला आणि मुली सामाजिक पेहरावात उपस्थित होत्या.यावेळी गोर सेना तालुका अध्यक्ष चंदन पवार,नगरसेवक बाळू जाधव,युवा सेना तालुका प्रमुख जॉकी राठोड,लखन नाईक,रमेश पवार,अतिष राठोड, लखन राठोड,अविनाश राठोड, सुनील राठोड,यादव गावंडे,दिनेश राठोड, अनिकेत राठोड, चेतन राठोड, रंजित वडत्या, राहुल राठोड, मोतीराम जाधव यांच्यासह गोर सेनेचे पदाधिकारी, तरुण,जेष्ठ नागरिक उपस्थित होते.