देशवासियांची रक्षा करण्यास सदैव कटिबध्द - सुनील वर्षणे

देशवासियांची रक्षा करण्यास सदैव कटिबध्द - सुनील वर्षणे

कोब्रा बटालियन २०६ येथे रक्षाबंधन कार्यक्रम



भंडारा, दि. २६ ऑगस्ट:- आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे व आपले कुटुंब, मित्र परिवार सोडून समाजाचे रक्षण करणाऱ्या कोब्रा बटालियन २०६ , केंद्रीय रिझर्व पुलीस दलातील सैनिक ऊन, वारा, पाऊस व हिमवर्षा याची तमा न बाळगता डोळ्यात तेल घालून सदैव तैनात असलेल्या सैनिकांना भंडारा येथील नूतन कन्या विद्यालयातील एन सी सी च्या विद्यार्थिनी व  जिजामाता विद्यालय तसेच जे. एम. पटेल महाविद्यालय येथील विद्यार्थिनींनी संस्कार चळवळ ग्रामीणच्या वतीने "धागा शौर्य का, राखी अभिमान की" या उपक्रमांतर्गत सैनिकांना संदेश रुपी पत्र व राख्या पाठविण्यात आल्या व  कोब्रा बटालियन येथे रक्षाबंधन कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला.
 या कार्यक्रमाला कोब्रा बटालियन २०६ चे कमांडंट सुनील वर्षणे, द्वितीय कमान अधिकारी दिनेश सिंह, डेप्युटी कमांडंट रमेश यादव, बेला केंद्र प्रमुख प्रदीप काटेखाये, संस्कार चळवळ ग्रामीणचे प्रमुख विलास केजरकर  उपस्थित होते.
आमच्या सैन्यात जो पर्यंत प्राण आहे तो पर्यंत आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यातील शञुशी सामना करून देशवासियांची रक्षा करण्यास कटिबध्द राहणार असे प्रतिपादन कोब्रा बटालियन २०६ चे कमांडंट सुनील वर्षणे यांनी केले. त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरणे देऊन रक्षाबंधन या पवित्र सणाचे महत्व पटवुन दिले. तसेच उपस्थित मान्यवरांना संस्कार चळवळीचे प्रमुख विलास केजरकर, समीर नवाज, यशवंत बिरे, राष्ट्रीय खेळाडु प्राची चटप यांनी संदेशरुपी पत्र व राख्यांचा बॉक्स कोब्रा बटालियनचे कमांडंट सुनील वर्षणे यांच्या स्वाधीन केले. त्यावेळी जे. एम. पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राची केशव चटप हिने सीमेवर तैनात असलेल्या सर्व सैनिक बांधवाना राखी बांधून बहिण भावाच्या या पवित्र सणाला बहिणीची उणीव भासू दिली नाही. माञ प्रत्येक सैनिकांचे डोळे पाणावलेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन २०६ कोब्रा बटालियनचे डेप्युटी कमांडंट रमेश यादव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता २०६ कोब्रा बटालियनचे सहाय्यक कमांडंट मखनलाल, सहाय्यक कमांडंट विक्रांत वेद्वान, सहाय्यक कमांडंट के. कझीपमी, सय्यद जाफरी तसेच इतर सैनिकांनी सहकार्य केले.