नकोडा येथील लोखंडी दरवाजा चोरट्यांना अटक

नकोडा येथील लोखंडी दरवाजा चोरट्यांना अटक

  

     दिनांक २० ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान घुग्घुस येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद तेलगू शाळा नकोडा येथील दोन लोखंडी दरवाजे अज्ञात चोरट्यांनी  चोरून नेले.
     फिर्यादी श्रीनिवास पुंडलिक उन्नवा रा.नकोडा यांनी घुग्घुस पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९गुन्हा दाखल करून तपासचक्रे जलद गतीने फिरवून आरोपी स्वामी भुमय्या दुर्गम व मुनीराज परमेश मंचीनिल्ला रा. नकोडा यांना मंगळवार २४ ऑगस्ट रोजी अटक केली व दोन लोखंडी दरवाजे किंमत सात हजाराचा मुद्देमाल जप्त केला व गुन्हा उघडकीस आणला.
     ही कारवाई पो.नि.राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गौरीशंकर आमटे, मनोज धकाते, रंजित भुरसे, महेंद्र वन्नकवार, रवी वाभीटकर, नितीन मराठे यांनी केली.