भिमा साळुंके यांची बिरसा फायटर्स रास्तापूर गाव अध्यक्ष पदी निवड

भिमा साळुंके यांची बिरसा फायटर्स रास्तापूर गाव अध्यक्ष पदी निवड

       बिरसा फायटर्सची नवीन गाव शाखा रास्तापूर  गठीत

 अहमदनगर: बिरसा फायटर्स गाव शाखा रास्तापूर गाव अध्यक्ष पदी भिमा साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.  दिनांक 06 जून 2021 रोजी गाव शाखा तयार करण्यासाठी रास्तापूर  येथे सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेत बिरसा फायटर्स गाव शाखारास्तापूर तालुका राहाता जिल्हा अहमदनगर  तयार करण्यात आली. 
         गाव शाखा पुढीलप्रमाणे आहे. गाव अध्यक्ष भिमा साळुंके  ,उपाध्यक्ष उमाजी पवार  ,महासचिव मच्छिंद्र रजपूत  ,कार्याध्यक्ष रविंद्र गायकवाड, कोषाध्यक्ष सुभाष खुरसणे, दिपक माळी  सहसचिव ,सल्लागार मच्छिंद्र पवार , महिला प्रतिनिधी विमल रजपूत ,ज्ञानेश्वर बर्डे   संघटक , रमेश सोनवणे  प्रसिद्धी प्रमुख  इत्यादी याप्रमाणे गाव शाखा तयार करण्यात आली आहे.
    नवीन गाव शाखेतील सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे बिरसा फायटर्स चे संस्थापक अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी अभिनंदन केले आहे तसेच राज्याध्यक्ष मनोज पावरा,जिल्हाध्यक्ष नंदुरबार  साहेबराव कोकणी , राज्य प्रवक्ता रोहित पावरा,राज्य  महासचिव राजेंद्र पाडवी यांनीसुद्धा नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे खूप खूप अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन गाव रास्तापूर पदाधिकारी व सदस्य यांचे सर्व आदिवासी बांधवांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.